Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसअभावी विद्यार्थ्यांना बघावी लागते तासनतास वाट

देवळाली प्रवरा ः दररोज शाळा सुटल्या नंतर दोन-तीन तास बस वाट पाहावी लागत असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिंनी घरी वेळेवर पोहचत नसल्याने पालकांच्या

नगर लसीकरण केंद्रात पुन्हा वाढदिवसाचा धूम धडाका l पहा LokNews24
सारडा वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू
पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी ठोळे, उपाध्यक्षपदी लोहकरे

देवळाली प्रवरा ः दररोज शाळा सुटल्या नंतर दोन-तीन तास बस वाट पाहावी लागत असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिंनी घरी वेळेवर पोहचत नसल्याने पालकांच्या जीवाला घोर लागत होता. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांची समस्या समजून घेतल्यावर काही क्षणात प्रश्‍नाची सोडवणूक केली.विद्यार्थी वेळेवर घरी पोहचाणार असल्याने पालकांनीही आमदार तनपुरे यांची कृतज्ञता व्यक्त केली.
              राहुरी तालुक्यातील उंबरे, पिंप्री अवघड, गोटुंबे आखाडा परिसरातील विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेवर बस नसल्याने बस स्थानकावर दोन ते तिन तास बसची वाट पाहत थांबावे लागत होते.वेळेवर विद्यार्थी घरी येत नसल्याने पालकांच्या जिवाला घोर लागत होता.या गावातील काही पालकांनी आ.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेवून विद्यार्थ्यांची समस्या कानावर घातली.त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाच्या श्रीरामपूरचे आगार प्रमुखांना भ्रमनध्वनी वरून संपर्क करून बसची वेळ बदलण्यास सांगितले.बसची वेळ बदलल्यास शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दुर होणार असल्याचे आगार प्रमुख यांनीही बसची वेळ बदलून विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बसची वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी बस जाण्याची वेळ 11.45 ची होती.आणि शाळा 12 वाजता सुटत होती. त्यामुळे पुढील बस साठी 2-3 तासांची वाट पहावी लागत होती.तिन तास विद्यार्थ्यांना बस स्थानकावर बसुन राहावे लागत होते.यापुढे माञ हिच बस आता विद्यार्थ्यांच्या सोयी नुसार 12 वाजून 20 मिनिटांनी करण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थी वेळेवर घरी पोहचार असल्याने.शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आ.तनपुरे यांचे आभार मानले. उंबरे गावातील गोरक्षनाथ दुशिंग, बंडू नारायण ढोकणे, दत्तात्रय दुशिंग, अशोक भाऊसाहेब दुशिंग, उद्धव काशिनाथ हापसे, बाबासाहेब ढोकणे आदिनी आमदार तनपुरे यांना निवेदन दिले.बसचे वेळापञक बदलण्याची मागणी केली.विद्यार्थ्यांचा प्रश्‍न लगेच सोडल्या बद्दल सर्व पालकांच्या वतीने आ.तनपुरे यांचे आभार मानले. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यामुळे बसची वेळ बदलल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे.आपण वेळेवर घरी पोहचणार असल्याने विद्यार्थ्यांनी आमदार प्राजक्त तनपूरे यांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS