मुंबई/प्रतिनिधी ः .मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य, पण भाजपची इच्छाशक्तीच नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

मुंबई/प्रतिनिधी ः .मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य, पण भाजपची इच्छाशक्तीच नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य, पण भाजपाची इच्छाशक्तीच नाही. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व मार्ग बंद झालेत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आरक्षण देण्याचे सर्वच मार्ग बंद झालेले नाहीत. सत्ताधारी पक्षाने राजकीय इच्छाशक्ती दाखविली, तर मराठा समाजाला आरक्षण देणे सहज शक्य आहे.’ असे त्यांनी सांगितले. ’केंद्रात भाजपाची सत्ता आहे. महाराष्ट्रातील सत्तेत भाजपाच सर्वांत मोठा पक्ष आहे. कोणत्याही पक्षाचा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने ठरविले, तर हा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो. आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण घटनादुरुस्ती करुन देण्यात आले आहे. याचा अर्थ आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने म्हणजे भाजपाने घटनादुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला, तर कोणताही पक्ष विरोध करणार नाही. मग, भाजपा घटनादुरुस्ती का करत नाही? हाच प्रश्न आहे.’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विजय वड्डेटीवार यांनी पुढे सांगितले की, ’दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करुन तो राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात समावेश केला पाहिजे. तामिळनाडूतील 69 टक्के आरक्षणाचा कायदा तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना गळ घालून नवव्या परिशिष्टात समाविष्ट करवून घेतला. करुणानिधींना जे जमले ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना का जमणार नाही? केंद्रात आणि महाराष्ट्रात एक विचाराचे डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन झाले असेल, तर अडचण काय? हाही प्रश्न उपस्थित होणारा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
COMMENTS