Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमीनीच्या वादातुन शेतकर्‍यावर चौघांचा विळ्याने हल्ला ;मुलगा, सुनेला ही मारहाण

माजलगाव प्रतिनिधी - तालुक्यातील लवुळ नं.1येथील एका शेतकर्‍यावर जमीन आमची आहे तुम्ही येथुन निघुन जा म्हणत याच गावातील चौघांनी संगनमत करून त्या शे

बीडमध्ये महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 
उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्यायची काळजी

माजलगाव प्रतिनिधी – तालुक्यातील लवुळ नं.1येथील एका शेतकर्‍यावर जमीन आमची आहे तुम्ही येथुन निघुन जा म्हणत याच गावातील चौघांनी संगनमत करून त्या शेतकर्‍यावर लोखडी विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले तर त्यांच्या मुलगा व सुनेला हि शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नुसार माजलगाव तालुक्यातील लवुळ नं. 1येथील शेतकरी सखाराम तुकाराम शिंदे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन त्यांच्या मालकिची शेतजमीन तालुक्यातील लहामेवाडी शिवारातील गटनं. 459/3मध्ये असुन त्या ठिकाणी ते त्यांचा मुलगा व सुने सोबत 15ऑक्टोबर रोजीच्या दुपारी 2वा.काम करत होते. त्यावेळी आरोपी नामे दत्तात्र्य लक्ष्मण भगत ,सुमन दत्तात्रय भगत ,लहु दत्तात्र्य भगत,अंकुश दत्तात्र्य भगत रा.लवुळ नं.1 चौघे संगनमत करून आले आणि सखाराम शिंदे सह मुलगा, सुनेला शिविगाळ करत म्हणाले की, त्यांची शेती आहे त्यामुळे तुम्ही येथुन निघुन जा. एवढेच नाही तर चौघांनी मिळुन सखाराम शिंदे यांच्या डोक्यावर लोखंडी विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले तर सखाराम यांच्या मुलगा व सुने ला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या या फिर्यादी नुसार नमुद नामे आरोपीं विरोधात भादंवि.कलम 323,324,504,506,34प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

COMMENTS