Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी चा फेलोशिप अवॉर्ड प्राप्त

माजलगाव प्रतिनिधी - येथील सुप्रसिद्ध लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी च्या वतीने प्रतिलिपी फेलोशिप प्रोग्राम मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रतिलि

टेक्निशियन विना तीन कोटीची सिटीस्कॅन मशीन पडून राहणार?
कर्जत ’महसूल’चा भोंगळ कारभार ?
नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजलगाव प्रतिनिधी – येथील सुप्रसिद्ध लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी च्या वतीने प्रतिलिपी फेलोशिप प्रोग्राम मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रतिलिपी फेलोशिप अवॉर्ड मिळाला असून त्यांचे याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
यासंदर्भात प्रतिलिपी ने त्यांना पाठवलेल्या प्रशस्ती पत्रात म्हटले आहे की प्रतिलिपी वरील तुमच्या अनेक विश्‍वासू वाचकांनी तुमची कथा मालिका वाचली हे पाहून आम्हाला मनापासून आनंद झाला, इतकेच नाही तर तुमची कल्पनाशक्ती सर्जनशीलता आणि दीर्घकालीन काल्पनिक कथा लिहिण्याचे समर्पण तुमची प्रतिभा आणि यशस्वी लेखन करिअरची क्षमता दर्शवते. तुमची कथा मालिका इतर लेखकांसाठी प्रेरणादायी आहे तुम्ही केवळ प्रतिलिपी लेखक समुदायातच नाही तर संपूर्ण साहित्यात कथाकथनाचा स्तर उंचावला आहे तुमचा अनोखा दृष्टिकोन जलंत वर्णन आणि मनमोहक कथा कथन खरोखरच सुंदर आहे , आणि कौतुकास्पद आहे. तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक भागाने एकंदर कथेत सखोलता आणि समृद्धता जोडली आहे ज्यामुळे वाचक पुढील भागाची आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचे आम्ही पाहिले आहे. तुमचे वाचक तुमच्या पुढील कथा मालिकेची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. शब्दांची शक्ती एखाद्याचे जीवन बदलू शकते आणि अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते तेव्हा आपण असेच लिहित रहा असे त्यात नमूद करण्यात आले असून प्रतिलिपीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. एक प्रतिष्ठित लेखक म्हणून या यशाचे साक्षीदार होण्यासाठी प्रतिलिपी उत्सुक असल्याचेही शेवटी त्यांनी म्हटले आहे.
प्रतीलिपी फेलोशिप प्रोग्रॅम मध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित केलेल्या फेलोशिप प्रोग्रॅम मध्ये बारा दिवसाचे लाईव्ह ऑनलाइन ट्रेनिंग प्रदीप कुलकर्णी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्यांना याबद्दल हे प्रशस्तीपत्र देण्यात आले असून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. समर्पण सर्जनशीलता आणि कथाकथनाची आवड खरोखरच कौतुकास्पद आहे असे या प्रमाणपत्रांमध्ये प्रतिलिपी च्या वतीने नमूद करण्यात आले आहे. प्रतिलिपी चा फेलोशिप अवॉर्ड प्रदीप कुलकर्णी यांना मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS