Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं  

सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाण्यात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिली. हा पोल

विक्रोळीतील अपघातात दोघांचा मृत्यू
वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले
दुर्दैवी ! तीन जिवलग मित्रांचा मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाण्यात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिली. हा पोलीस कर्मचारी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलेलं नाही. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेमध्ये पोलीस गाडी चालवली. यावेळी पोलीस गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याने 3 वाहनांना धडक दिली. नंतर अपघातग्रस्त पोलीस वाहन एका झाडावर जाऊन आदळलं. गाडीचा चालक नशेत असल्याने सदरची घटना घडली.

COMMENTS