Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली – बंगळूरू इंडिगो विमानात मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा

विमान प्रवासादरम्यान वारंवार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशांकडून विचित्र प्रकार होत असताना दिसून येत आहे. पुन्हा एकदा विमानप्रवासाच्या दरम्यान

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तापमानवाढीचे संकट पेलतांना …
प्रियंका चोप्राचे दीर जाऊ सोफी टर्नर-जो जोनास घटस्फोट घेणार ?

विमान प्रवासादरम्यान वारंवार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशांकडून विचित्र प्रकार होत असताना दिसून येत आहे. पुन्हा एकदा विमानप्रवासाच्या दरम्यान मद्यधुंद तरुणाने विमानात धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विमान प्रवासातच्या दरम्यान प्रवाशांकडून असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार पुढे येत आहेत. इंडिगो विमानामध्ये एक प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत असंच काहीस केलं त्यामुळे सर्वांनाच धास्ती लागली होती दिल्लीवरुन बंगळुरूला जाणााऱ्या विमानातून ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नशेच्या अवस्थेत एका 40 वर्षीय प्रवाशाने विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. बेंगळुरूला पोहोचताना या प्रवाशाला CISF च्या ताब्यात देण्यात आलं. इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की विमान 6E 308 दिल्लीहून बंगळुरूला जात असताना त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद प्रवाशाचं वर्तन पाहून क्रू मेंबर आणि वैमानिक सर्तक झाले. त्यांनी प्रवाशाला वॉर्निंग दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला सुरक्षित लॅण्ड करण्यात आल्यानंतर त्याला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानात असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत..

COMMENTS