Homeताज्या बातम्यादेश

गुजरातच्या बंदरातून 350 कोटींचे ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली ः गुजरातमधील वेरावळ बंदरातून 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सुमारे 50 किलो हेरॉईनची ही खेप मासेमारी बोटीतून समुद्रमार्

राजकीय कोंडी फोडण्याची इतिहास दत्त जबाबदारी ओबीसींचीच!
सामाजिक ध्रुवीकरणाकडून धार्मिक ध्रुवीकरणाकडे ?
‘जगेल तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत ठेवणार नाही’

नवी दिल्ली ः गुजरातमधील वेरावळ बंदरातून 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सुमारे 50 किलो हेरॉईनची ही खेप मासेमारी बोटीतून समुद्रमार्गे वेरावळ येथे आणण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री बोटीतून हेरॉईन आणल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यानंतर एटीएस, गीर-सोमनाथ एसओजी, एलसीबी, एफएसएल, सागरी पोलीस, वेरावळ पोलिस आणि तटरक्षक दलाने कारवाई सुरू करून पहाटे हेरॉईन जप्त केले. यासोबतच बोटीतील 9 जणांना पकडण्यात आले आहे. ज्यांची चौकशी केली जात आहे.

COMMENTS