Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त

मिठाच्या गोदामात ठेवले होते लपवून

पुणे : पुण्यात एका कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत. दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेट

विकसित भारताचा संकल्पपूर्ण करणारी निवडणूक
सामूहिक अत्याचारप्रकरणी दोन जवानांना अटक
संगमनेर तालुक्यात वेश्या व्यवसायावर छापा

पुणे : पुण्यात एका कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत. दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेटरी या एमडी अमली पदार्थ बनवणार्‍या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये तब्बल 1100 कोटी रुपयांचे 600 किलो एमडी अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे उपस्थित होते.
याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई करत सुरुवातीला चार कोटींचे ड्रग जप्त केले होते. त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू करत विश्रांतवाडी येथे दोन गोदामांवर छापा टाकला. यामध्ये मिठाच्या गोदामात लपवून ठेवलेले 55 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर युद्ध पातळीवर तपास करत कुरकुंभ एमायडीसीमधील एमडी ड्रग्ज बनवणार्‍या कंपनीवर छापा टाकण्यात आला. यानंतर ही कंपनी अनिल साबळे नावाच्या व्यक्तीची असून त्याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा आणि विविध परदेशी व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रासायनिक तज्ज्ञ देखील सहभागी असून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. अंमली पदार्थांचा तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहे. या प्रकरणात आणखी अमली पदार्थ मिळून येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी आरोपींनी कारखाने सुरू केले आहेत का यात देखील चौकशी करण्यात येत आहे.

COMMENTS