Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर दुष्काळाचे सावट गडद

पावसाअभावी पिकं वाया जाण्याची भीती

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात तब्बल 20-25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके होरपळतांना दिसून येत आहे. राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्या

राजेवाडी तलावाची पर्यटकांना भुरळ: पर्यटकांची गर्दी वाढू लागली
बळीराजा शेतकरी संघटनेचे कराडमध्ये धरणे आंदोलन
साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात तब्बल 20-25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके होरपळतांना दिसून येत आहे. राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास पिके जळून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट घोंघावतांना दिसून येत आहे. ऐन ऑगस्ट महिन्यामध्येेदेखील अनेक जिल्ह्यात टँकर सुरू असल्यामुळे दुष्काळाचे सावट तीव्र होतांना दिसून येत आहे.
हवामान विभागाने राज्यात 17 ऑगस्टनंतर पावसाला सुरूवात होईल आणि नंतर 19 ऑगस्टनंतर मुसळधार पावसाचा अंदाज केला होता. मात्र गुरुवारपर्यंत राज्यात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके कशी वाचवायची हा शेतकर्‍यांसमोर गंभीर प्रश्‍न आहे. राज्यात पावसाअभावी प्राण्यांचे देखील हाल होतांना दिसून येत आहे. पावसाअभावी नवा चारा अजूनही आलेला नाही, त्यामुळे जनावरांना चारा कोणता द्यायचा हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील अने जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आमि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे हातची पीके वाया जाण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे राज्यात पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पाणीटंचाईचे संकट आल्यास शेतकर्‍यांच्या पिकांबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न देखील उद्भवण्याची शक्यता आहे.

पिकं लागली करपू राज्यात जून महिन्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या. जुलै महिन्यामध्ये पावसाला सुरूवात झाली, त्यानंतर शेतकर्‍यांनी पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, या चालू ऑगस्ट महिन्यात पावसानं चांगीच दडी मारली आहे. पावसाच्या या स्थितीमुळे शेतकर्‍यांची मका, कापूस, सोयाबीन, मूग , बाजरी, तूर पीकं करपू लागली आहेत.  खरिपाचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची शेतकर्‍यांना भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

चार्‍याच्या किमती वाढण्याची भीती – राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतांना, जनावरांची देखील फजिती होण्याची शक्यता आहे. कारण जर आगामी काही दिवस पुरेसा पाऊस न पडल्यास जनावरांसाठी मिळणार्‍या चार्‍याच्या किंमती देखील महागण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात प्रशासनाकडून आपल्या जिल्ह्यातून इतरत्र चारा नेण्यास बंदी घातली आहे.

आता सप्टेंबर महिन्यातच पाऊस –राज्यात पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यात आतापर्यंत झाला आहे. पुणे हवामान विभागानुसार आता या महिन्यात पाऊस नसणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकर्‍यांनी नियोजन करावे, अशी सूचना पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे. राज्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑगस्ट महिन्याचा फक्त एक आठवडा राहिला आहे. या एका आठवड्यातही राज्यात पाऊस नाही. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

COMMENTS