अहमदनगर/प्रतिनिधी ः आता तुमचे ट्रिपल इंजिन सरकार मागे डबेही लागले आहेत. थोडीजरी नीतिमत्ता सरकारमध्ये असेल तर शेतकर्यांना तातडीने मदत करा. आम्ही
अहमदनगर/प्रतिनिधी ः आता तुमचे ट्रिपल इंजिन सरकार मागे डबेही लागले आहेत. थोडीजरी नीतिमत्ता सरकारमध्ये असेल तर शेतकर्यांना तातडीने मदत करा. आम्ही सरकारला जाब विचारणार आहे. दुष्काळ सदृश्य आणि मंत्री, पालकमंत्री अदृश्य असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकर्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकर्यांच्या मुद्द्यांवरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
’सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ आपल्या उरावरी, अशा शब्दात शेतकर्यांच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारला फैलावर घेतले. उद्धव ठाकरे म्हणाले, ’बर्याच दिवसानंतर पावसात भिजत दुष्काळी दौरा केला. महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. आता पाऊस आला असला तरी किती प्रश्न सुटेल? पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा प्रश्न सुटेल. मात्र दुबार पेरणीचं नुकसान कसं भरून निघणार, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. ’शेतकर्यांचे मागील नुकसानीचे पैसे अजून मिळाले नाही. एक रुपयात पीक विम्याचा काय झालं. कांद्याचं काय झालं? दुष्काळाचे पंचनामे कधी करणार? सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ आपल्या उरावरी. जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा यांना मदत करा. दुष्काळ दूर होवो , ही साई चरणी प्रार्थना, असे ते पुढे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव, संगमनेर, राहता तालुक्यातील शेतकर्यांशी त्यांना संवाद साधला. शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असलेले बबन घोलप आणि भाऊसाहेब वाकचौरे हे देखील उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांना आपल्या समस्या यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. भर पावसात उद्धव ठाकरे शेताच्या बांधावर होते. उद्धव ठाकरेंनी पावसात भिजत शेतकर्यांशी संवाद साधला. आपलं सरकार नसलं, तरी तुम्ही माझ्यासोबत आहात. आपलं सरकार असताना शेतकर्यांना मदत दिली, मात्र मागच्या वर्षी गद्दारांनी सरकार पाडले, असा निशाणा उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस सरकारवर पाडला. शेतकर्यांना वेळेवर मदत मिळाली नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीतर आंदोलन करणार. शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. शेतकर्यांना मदत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शक्य ते करू, असं आश्वासनही त्यांना यावेळी दिलं.
COMMENTS