Homeताज्या बातम्यासंपादकीय

दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई

राज्यात यंदा तीव्र पाणीटंचाईचे संकट डोक्यावर असतांना, याकडे कुणाचेही गांभीर्याने लक्ष दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि आरोप-प्रत

भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा
अर्थसंकल्प आणि शेतकरी
कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !

राज्यात यंदा तीव्र पाणीटंचाईचे संकट डोक्यावर असतांना, याकडे कुणाचेही गांभीर्याने लक्ष दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फेर्‍यात महाराष्ट्रातील राजकारण अडकले असतांना, पाणीटंचाईकडे सोयरसुतक कुणालाही दिसून येत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेची लाट असतांना दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा दिसून येत आहे. मुंबईतील पाणीसाठा केवळ 27 टक्के शिल्लक असल्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईची मोठी समस्या सहन करावी लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातील बंगळुरू या शहरात पाणीबाणीचे गंभीर संकट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बंगळुरू म्हटले की आयटीचे हब म्हणून ओळखले जाते. याचठिकाणी अनेक कंपन्या, अभियंत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर काम करतांना दिसून येत आहे. मात्र या कर्मचार्‍यांची पाण्याअभावी, अंघोळीअभावी मोठी ताराबंळ उडाल्याचे चित्र बंगळुरू या शहरामध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रामध्ये देखील पुढील महिन्यात अशी गंभीर परिस्थिती निर्माण न झाल्यास नवल वाटायला नको. कारण ग्रामीण भागातील महिला हंड्याभर पाण्यासाठी वणवण करतांना फिरतांना दिसून येत आहे.

तर दुसरीकडे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होतांना दिसून येत आहे. उष्णतेच्या तीव्र झळ्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटतांना दिसून येत आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमध्ये मिळून केवळ 27 टक्के पाणी शिल्लक असतांना, दुसरीकडे राज्यात आणि देशातही पाणीसाठा 35 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट घोघांवतांना दिसून येत आहे. पाणीटंचाईमुळे पिण्याचे पाण्याची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. यासोबतच घरी, शाळांमध्ये आणि आरोग्य-सेवा सुविधांमध्ये मूलभूत स्वच्छता पाळण्यासाठी सुरक्षित पाण्याचा प्रवेश मर्यादित होतो. जेव्हा पाण्याची कमतरता असते, तेव्हा सांडपाणी व्यवस्था निकामी होऊ शकते आणि कॉलरासारख्या रोगांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तुटपुंजे पाणीही महाग होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः मुलींसाठी, शाळांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची नोंदणी, उपस्थिती आणि कामगिरीवर परिणाम होतो. लांब अंतरापर्यंत पाणी वाहून नेणे देखील एक प्रचंड शारीरिक ओझे आहे आणि यामुळे मुलांना सुरक्षिततेच्या जोखमी आणि शोषणाला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागामध्ये महिला मुली विहीरीत उतरून जीवाचा धोका पत्करून पाणी काढतांना दिसून येत आहे. एक महिला किंवा मुलगी जीवावर खेळून विहीरीत उतरते, आणि पाणी भरून देते, तर दुसरी महिला ती पाणी बादलीने उपसते, हीच परिस्थिती आजही खेड्यापाड्यात दिसून येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट गहिरे होतांना दिसून येत आहे.

आजमितीस मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज 3,900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर आहे. रविवारी उर्ध्व वैतरणा धरणात 36.60 टक्के, मोडकसागरमध्ये 24.97 टक्के, तानसामध्ये 41.86 टक्के, मध्य वैतरणामध्ये 12.13 टक्के, भातसामध्ये 26.34 टक्के, विहारमध्ये 39.61 तर तुळशीमध्ये 44.20 टक्के साठयाची नोंद झाली. सातही धरणांमध्ये सरासरी केवळ 27.81 टक्के पाणीसाठा आहे. 7 एप्रिल 2023 रोजी 33.90 टक्के तर 2022 मध्ये 36.76 टक्के पाणीसाठा होता.  वास्तविक पाहता धरणामध्ये जो पाणीसाठा शिल्लक आहे, तो झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. कारण साधारणतः मे महिन्यामध्ये तापमान चाळीशी ओलांडण्याचा अनुभव आहे. मात्र चाळीशीचे तापमान मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ओलांडल्याचे दिसून आले. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तीव्र झळा अनुभवायला मिळाल्या. 

COMMENTS