Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ला

बगदाद : मध्यपूर्वेत तणावाची तीव्रता वाढत असून त्याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. इराकची राजधानी बगदाद येथे असलेल्या अमेरिकेच्या दूताव

दुबईकडे जाणारी एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द
गुजरातमध्ये एलपीजी गॅसचे ‘नंदा देवी’ जहाज दाखल
सर्वसामान्यांचे जगणे झाले महाग !


बगदाद : मध्यपूर्वेत तणावाची तीव्रता वाढत असून त्याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. इराकची राजधानी बगदाद येथे असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन आणि रॉकेटद्वारे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या काही तास आधीच दूतावासाकडून तेथील अमेरिकन नागरिकांना सुरक्षा इशारा देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे स्पष्ट होते.
इस्रायलने तेहरान येथे मोठ्या प्रमाणावर हवाई कारवाई केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमुळे तेहरानच्या उत्तरेकडील भागात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अस्थिर वातावरणात भारतासाठी काही प्रमाणात दिलासा देणारी बाब म्हणजे ऊर्जा पुरवठा सुरूच असल्याचे चित्र आहे. एलपीजी आणि कच्चे तेल घेऊन दोन जहाजे आज गुजरातमधील कांडला बंदर आणि मुंद्रा बंदर येथे दाखल होणार आहेत. या जहाजांमुळे देशातील इंधन साठ्याला बळकटी मिळणार असून घरगुती गॅस पुरवठाही सुरळीत राहण्यास मदत होईल. यापूर्वीही एक जहाज मोठ्या प्रमाणावर एलपीजी घेऊन मुंद्रा येथे पोहोचले होते, ज्यामुळे लाखो गॅस सिलिंडर्सच्या समतुल्य साठा उपलब्ध झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. या युद्धनौकांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताकडे येणार्‍या व्यापारी जहाजे आणि तेलवाहू टँकर्सना सुरक्षा प्रदान करणे. गरज भासल्यास तातडीची मदतही उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. एकूणच, मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरता लक्षात घेता भारत आपल्या ऊर्जा पुरवठा मार्गांच्या सुरक्षेबाबत अधिक सजग झाला आहे. जागतिक घडामोडींच्या या पार्श्‍वभूमीवर देशाने सावध आणि संतुलित भूमिका घेतली असल्याचे दिसून येते.

COMMENTS