Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशाही बसमध्ये चालकाची आत्महत्या

नाशिक - सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात बुधवारी दुपारी पावणेतीन वाजेपासून बिघाडामुळे उभी असलेल्या शिवशाही बस मध्ये चालकाने

प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या.
गॅस सिलिंडर 73 रुपयांनी महागला
राज्यात तापमानाचा पारा वाढला

नाशिक – सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात बुधवारी दुपारी पावणेतीन वाजेपासून बिघाडामुळे उभी असलेल्या शिवशाही बस मध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राजू हिरामण ठुबे (49) रा दोनवाडे (भगूर), ता. नाशिक असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. चालक श्री. ठुबे हे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एक मध्ये कार्यरत होते.  शिर्डी येथून नाशिककडे शिवशाही बस क्रमांक एम एच 09 ई एम 1280 घेऊन ते जात असताना दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास वावी सोडल्यानंतर पांगरी शिवारात बस नादुरुस्त झाली. या बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये बसवून दिल्यानंतर श्री. ठुबे यांनी सिन्नर आगारात निरोप देऊन दुरुस्ती पथक पाठवण्याची विनंती केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत सिन्नर येथील दुरुस्ती पथक न आल्यामुळे त्यांच्यासोबत असलेली महिला चालक देखील निघून गेली. त्यामुळे बस सोबत चालक श्री. ठुबे एकटेच होते. रात्री सव्वा एक ते दीड वाजेच्या सुमारास सिन्नर येथील दुरुस्ती पथक बस जवळ आले. आवाज देऊनही चालक श्री. ठुबे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पथकातील कर्मचारी बसमध्ये चढले. अंधार असल्याने मोबाईलचे टॉर्च लावले असता पाठीमागे शेवटच्या सीटजवळ त्यांचा लटकलेला मृतदेह आढळून आला. कमरेच्या करदोऱ्याच्या साह्याने छताकडच्या एअर विंडोच्या हुकला अडकवून घेत चालक श्री. ठुबे यांनी आत्महत्या केली होती. ही बाब दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ सिन्नर आगारात कळवून वावी पोलिसांना सूचित केले. रात्री दीड वाजता घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने खाजगी रुग्णवाहिकेतून चालक ठुबे यांचा मृतदेह सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चालक श्री. ठुबे यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही

COMMENTS