Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध उपक्रम

कर्जत ः भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील खेड येथे विविध उ

सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम
गांजाची विक्री करणारा सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त 
शेतकर्‍यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना  

कर्जत ः भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील खेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्यावतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा तसेच विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदाताई पवार, संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, सचिव मकरंद सप्तर्षी, विश्‍वस्त प्रा. नंदा पाटील, आप्पा अनारसे, उद्योजक मेघराज बजाज तसेच सईताई पवार, माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब मोरे, नवनाथ जांभळकर, मंजुश्रीताई, महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपसिंह निकुंभ, विद्यालयाचे प्राचार्य गोरक्ष भापकर, पर्यवेक्षक बाळासाहेब काळे व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. उद्योजक मेघराज बजाज यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांनी योगदान दिले.

COMMENTS