Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी कडेवळीत डॉ. आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील बौद्ध समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रमाने

शेवगाव-पाथर्डीत लोकसभा निवडणूकीची पुर्वतयारी पूर्ण
वडगाव पान उपबाजार येथे कांदा लिलाव सुरू
जिद्द आणि कठोर परिश्रम हाच यशाचा मार्ग ः तुपसुंदर

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील बौद्ध समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. या जयंतीचे नियोजन नीलक्रांती ग्रुप टाकळी कडेवळीत यांनी केले. यावेळी गाव व तालुक्यातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशांत चव्हाण सर हे तर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबासाहेब इथापे होते.
यावेळी बौद्धाचार्य सतिश ओहोळ यांच्यासह बहुजन समता पत्राच संपादक चंदन घोडके, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा पदाधिकारी अमर घोडके, सुरज घोडके, पुष्पक घोडके, प्रविण सुडगे, बाळासाहेब रजपूत सह नियोजन समितीचे पदाधिकारी आणि निलक्रांती ग्रुपचे संजय भागवत, भागवत रणसिंग, हर्षद रणसिंग, मच्छिंद्र रणसिंग, लक्ष्मण रणसिंग, दादाराम रणसिंग, गौतम रणसिंग, हे मान्यवर मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक भरत रणसिंग यांनी केले. तर, सूत्रसंचालन जितेन्द्र रणसिंग यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमूख वक्ते प्रशांत चव्हाण सर यांनी आपले मार्गदर्शन पर भाषण केले. त्यांनी महापुरूषांच्या जीवन प्रवासाचा उल्लेख करीत टाकळी गावातील सामाजिक सलोख्याचा उल्लेख केला. सदरील गावात सर्व समाजात विशेष सौख्यपूर्ण वातावरण असल्याने आनंद व्यक्त केला. समाजाला विचारप्रवर्तक संदेश देणारे सर्व महापुरुष आणि विचारवंतांच्या सत्कार्याचा उल्लेख करून आपल्या प्रमुख भाषणातून सर्व उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अमर घोडके, सतिश ओहोळ, चंदन घोडके, डॉ.सुभाष देशमुख, सुदाम नवले, सूदाम खामकर, अशोक नवले सह कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब इथापे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुदाम सोनवणे सर यांनी केले, नीलक्रांती ग्रुपकडून आयोजीत जयंती उत्सवात अन्नदान करण्यात आले. यावेळी माणिक रणसिंग, भागवत रणसिंग, बापू रणसिंग, नामदेव रणसिंग, पांडुरंग आबा रणसिंग, विश्‍वनाथ रणसिंग, रमेश रणसिंग, बाळु गणपत रणसिंग, बाळू बबन रणसिंग, शत्रुघ्न रणसिंग, मिराचंद रणसिंग, गोरख रणसिंग, सतपाल रणसिंग, स्वप्नील रणसिंग, सुशील रणसिंग, सुमित चव्हाण, आदित्य रणसिंग, संतोष विलास सोनवणे, डॉ. प्रशांत रणसिंग, मनोज रणसिंग, ज्ञानदेव रणसिंग, पांडुरंग गणपत रणसिंग, पत्रकार दादा सोनवणे, गुलाब श्रीरंग रणसिंग सह नीलक्रांती ग्रुप टाकळी कडेवळी येथील समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS