Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.सुरेश साबळेंनी पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची केली स्वच्छता

पाटोदा प्रतिनिधी - पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची ऑन द स्पॉट पाहणी करताना पाटोदा ग्रामीण रुग्णालय मध्ये अस्वच्छता आढळून आल्याने स्वतः बीड जिल्हा शल्

काँगे्रसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे
जिल्हा परिषदेत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी 
कोरोना संकट काळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी शासनाचे व्यापक प्रयत्न : राज्यपाल

पाटोदा प्रतिनिधी – पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची ऑन द स्पॉट पाहणी करताना पाटोदा ग्रामीण रुग्णालय मध्ये अस्वच्छता आढळून आल्याने स्वतः बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी हातात झाडू घेऊन डॉक्टर नर्स कर्मचारी इस्टाफ यांच्याकडून रुग्णालय स्वच्छ करून घेतले.
बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे आल्यापासून जिल्हा आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल पाहण्यास मिळाले आहे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.सुरेश साबळे स्वतः ग्राउंड वर असून लोकांची अडचण सोडविण्यात अग्रेसर आहेत. पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची ऑन द स्पॉट पाहणी करताना तेथील अस्वच्छता आढळून आल्यामुळे तात्काळ हातात झाडू घेऊन सर्व स्टाफ नर्स कर्मचारी यांना सोबत घेऊन स्वच्छता करून घेतली. तसेच दांडी बहाद्दर कर्मचार्‍यांना देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं यामुळे येथील कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ पाहण्यास मिळाली आहे. तसेच यापुढे आता न सांगताच ऑन द स्पॉट ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात येणार असल्याचे देखील डॉक्टर सुरेश साबळे यांनी सांगितलं.

COMMENTS