सूर्याच्या तेजाने बरसले डॉ. मनमोहन सिंग !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सूर्याच्या तेजाने बरसले डॉ. मनमोहन सिंग !

भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधीनंतर आपले विचार मांडले आहेत. मात्र त्यांनी ज्या पद्धती

आमचे लक्ष उद्याची विधानसभा निवडणुकीवरच
कोपरगावात शिवसेना ठाकरे गटाकडून जिजाऊंना अभिवादन
मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…

भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधीनंतर आपले विचार मांडले आहेत. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली त्यातून वर्तमान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी अगदीच राष्ट्रीय आरोपाखाली घेरले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मते देशा संविधान दिवसेंदिवस कमजोर केले जात असून संवैधानिक संस्था या आणखी कमकुवत केल्या जात आहेत. सामाजिक अन्याय हा शिगेला पोहोचत असून देशातील गरीब हा अधिक गरीब होत आहे तर श्रीमंत हा प्रचंड श्रीमंत होत आहे असा घणाघाती वक्तव्य त्यांनी आज केले. गेली सात वर्ष वर्तमान सरकार सत्तेत असूनही त्यांच्या कुठल्याही चुकीची कबुली न देता उलट पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्याही चुकीसाठी जबाबदार देण्याची पद्धती मोदी सरकारने जी अवलंबली आहे ती त्यांना त्यांच्या पापातून मुक्ती देणार नाही असा घणाघात ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला. डॉक्टर मनमोहन सिंग यांना 1991 नंतर देशातील आर्थिक बदलाला मूर्त स्वरूप देणारे अर्थतज्ञ म्हणून जसे ओळखले जाते तसे जागतिक आर्थिक संकटातून देशाला सावरण्याची त्यांची अर्थमंत्री म्हणून असणारी भूमिका ही देशात लोकप्रिय ठरली. परंतु ही लोकप्रियता त्यांना त्यांच्या अर्थमंत्री काळात मिळाली नसून मोदी सरकारच्या काळात जी कार्यक्षमता आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या शब्दात सांगायचे तर जो खोटेपणा वाढला आहे त्याच्यात उल्लेख ते आज लोकप्रिय अर्थतज्ञ आणि अर्थमंत्री म्हणून ओळखले जातात. काही काळापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी भाजपशी काँग्रेसला लढायचे असेल तर त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांनाच पुढे करायला हवे अशी भूमिका मांडली होती. त्यांनी ही भूमिका मांडण्यात मागे डॉक्टर मनमोहन सिंग यांची असणारी स्वच्छ प्रतिमा आणि विद्वत्तापूर्ण गांभीर्य या दोन गोष्टींचा महत्त्व विशेषत्वाने उल्लेख केला होता. मोदींची मुकाबला करायचा तर राहुल गांधी यांच्या कडून तो मुकाबला होणार नाही असं वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यांच्या मते काँग्रेस दीर्घकाळ सत्तेवर राहिली असल्यामुळे त्यांच्या इतर नेत्यांकडून अनेक चुकीच्या बाबी घडलेले असतील त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढताना काँग्रेसचा इतर कोणताही नेता पुरेसा ठरू शकत नाही. राहुल गांधी यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या तुलनेने तो कधीच आहे असा त्यांच्या बोलण्याचाही मतितार्थ होता. नरेंद्र मोदी यांना चीनने भारताची भूमी ताब्यात घेऊन जे ठाण मांडले आहे त्यावरूनही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुनावलेले खडे बोल म्हणजेच चीनने भारताच्या अधिकृत भूमीवर कब्जा केल्याचेही सिद्ध करणारे आहे. मात्र वर्तमान केंद्र सरकार हे जनतेला खोटी माहिती देऊन वेळ निभावण्याचा प्रयत्न करीत आहे, जे देशासाठी अत्यंत घातक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नेतृत्व विचार आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असणारे गांभीर्य हे आज त्यांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा देशवासीयांना समोर ठामपणे आले. चेहरे मेकअप केल्याने काहीही बदलत नाही वस्तुस्थिती आहे तीच राहते त्यामुळे सर्वप्रथम देशाच्या जनतेला फसवण्याचा षड्यंत्र या सरकारने ताबडतोब थांबवायला हवं आणि त्याचबरोबर जनतेला खरी माहिती देऊन आगामी काळात जनता किती संकटात आहे हे देखील त्यांच्यासमोर आणायला हवं ही डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका आज भारतीयांच्या मनावर विशेष फुंकर घालेल असे म्हणायला निश्चितपणे वाव आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान पद अनुभवल्यामुळे आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे श्रेय त्यांच्या आर्थिक विचारांना निश्चितपणे दिले जात असलं तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात प्रभावी शस्त्र जर काही असेल तर ते म्हणजे फार कमी वेळा बोलून ते प्रचंड परिणाम साध्य करतात. तोल मोल के बोल असं जे आपण एरवी ऐकत असतो ते शब्द डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बाबतीत अगदी शतप्रतिशत खरे ठरतात असे म्हणावे लागेल. 

COMMENTS