अक्षय बोठे, प्रवीण रुणवाल स्वीकृत नगरसेवक राहाता : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी भाजपचे नगरसेवक डॉ. विजय पुंडलिक सदाफळ यांची तर स्वीकृत नगरसेवकपद

अक्षय बोठे, प्रवीण रुणवाल स्वीकृत नगरसेवक
राहाता : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी भाजपचे नगरसेवक डॉ. विजय पुंडलिक सदाफळ यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी अक्षय संजय बोठे व प्रवीण रमणलाल रुणवाल या युवकांची एकमताने निवड करण्यात आली.
पिठासीन अधिकारी नूतन नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी या निवडीची घोषणा केली. निवडीनंतर जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री. वीरभद्र मंदिरात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
मंगळवारी दुपारी १ वा. नगरपरिषदेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर, गटनेते नगरसेवक मुन्नाभाई शहा, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी विजय सदाफळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाची घोषणा केली. याचवेळी स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या अक्षय बोठे व प्रवीण रुणवाल यांची नावे जाहीर केली.
यावेळी उपस्थित नूतन नगरसेवक राहुल सदाफळ, प्रवीण सदाफळ, अरुण आग्रे, दशरथ तुपे, ऋषिकेश पाळंदे, संदीप मुर्तडक, नितीन गाडेकर, नगरसेविका अंजली सदाफळ, पूजा गिधाड, रवीना माळी, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, अनिता शेळके, शितल बनकर, नीता गाडेकर यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

COMMENTS