Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. सुनील शिंदे यांच्या ‘अगस्त्यकांता लोपामुद्रा’ या गौरवस्तोत्राचे प्रकाशन

अकोले/प्रतिनिधी ः महर्षी अगस्ती यांच्या पत्नी लोपामुद्रा यांची विविध नावे आणि विशेषणांवर आधारित डॉ. सुनील यांच्या ’श्री अगस्त्यकांता लोपामुद्रा’

सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू नसून घातपातच
खांद्यावर हात ठेवून दोघांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पळवली 
कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक ः न्यायाधीश संजना जागुष्टे

अकोले/प्रतिनिधी ः महर्षी अगस्ती यांच्या पत्नी लोपामुद्रा यांची विविध नावे आणि विशेषणांवर आधारित डॉ. सुनील यांच्या ’श्री अगस्त्यकांता लोपामुद्रा’ या गौरवस्तोत्रा चे प्रकाशन महाशिवरात्री औचित्याने अगस्ती देवस्थान येथे संपन्न झाले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विख्यात विधिज्ञ अँड. के. डी. धुमाळ, विश्‍वस्त ह.भ प. दीपक महाराज देशमुख यांच्या हस्ते महर्षि अगस्ती तसेच ऋषिपत्नी लोपामुद्रा माता यांच्या चरणी अर्पण करुन स्तोत्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महाशिवरात्री शुभ पर्वात सकाळी संपन्न झालेल्या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी डॉ. शिंदे यांचा देवस्थान च्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र ग्लास हाऊस चे उद्योजक  रोशन भारत पिंगळे, प्रा. सात्विका रोशन पिंगळे, संगीता भारत पिंगळे, अगस्ती ट्रस्ट चे व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे , नीलेश गिरमे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्राचीन भारतातील एक दार्शनिक स्री, वादविवाद पटू, महान वेदाभ्यासक आणि विदर्भ कन्या लोपामुद्रा या महर्षी अगस्ती यांच्या पत्नी म्हणून विख्यात होत्या. दृढस्यू हा अगस्ती-लोपामुद्रा यांचा पराक्रमी पुत्र. वैदिक ऋषिकिनी म्हणून विख्यात ठरलेल्या लोपामुद्रा यांच्या नावावर ऋग्वेदातील खास दोन ऋचांचा संदर्भ मिळतो. अशा थोर विद्वान ऋषिकिनी लोपामुद्रा यांची विविध नावे आणि विशेषणे यांचा शोध घेऊन तसेच अनेक संदर्भ मिळवून-तपासून डॉ. सुनील शिंदे यांनी हे स्तोत्र लिहिले आहे.

COMMENTS