Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष 11 वर्षांनंतर निकाल

पुणे ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघां

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट
आईने आपल्या दोन मुलांची केली हत्या
कोरोनाची भीती : निवडणूक व्यवस्थापन तंत्र?

पुणे ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने शुक्रवारी सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाने या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयंचा दंड ठोठावला आहे. मात्र कोर्टाने या प्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. पुनळेकर हे या प्रकरणात जामिनावर सोडण्यात आले होते.

डॉ. दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या ओंकारेश्‍वर पुलावर सकाळी 7ः30 वाजता मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते संस्थापक होते. दाभोलकर खूनप्रकरणाचा तपास सीबीआयकडून दरम्यान, 2013 साली दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी अतिशय संथगतीने तपास केला जात असल्याचा आरोप दाभोलकर यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला होता. त्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. कर्नाटकात गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱे आरोपींना अटक करण्यात आली होती.

सुरुवातीला महाराष्ट्र पोलिस त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. सीबीआयने दाभोळकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात सप्टेंबर 2021 मध्ये खटला सुरू झाला. म्हणजेच हत्येच्या 8 वर्षांनंतर आरोपींविरोधात खटला सुरू झाला. आता निकाल आला आहे. दिरंगाईमुळे राज्यभरात अंनिसतर्फे ठिकठिकाणी काळ्या फित लावून निषेध करण्यात आला. यासोबतच ठिकठिकाणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन 3 प्रमुख मागण्या करण्यात आल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरच कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचीदेखील हत्या करण्यात आली. या चारही हत्येतील आरोपींचा परस्परसंबंध असल्याची चर्चा सुरू आहे. डॉ. दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांतर्फे प्रथम या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. मात्र, सुरुवातीला वर्षभर पोलिसांच्या हातात विशेष काही सापडले नाही. नेमकी हत्या का करण्यात आली? कोणी केली? हे सर्वच प्रश्‍न अनुत्तरित होते. तपास संथगतीने होत असल्याबद्दल दाभोळकर कुटुंबीयांनी कोर्टात नाराजी व्यक्त केली होती. त्यावरुन कोर्टानेही पोलिसांना फटकारले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

निर्दोष आरोपींविरोधात उच्च न्यायालयात जाणार ः हमीद दाभोलकर – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. ‘डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर आम्ही न्यायव्यवस्थेवर सातत्याने विश्‍वास ठेवत आलो आहोत. आज प्रत्यक्ष जे दोन मारेकरी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. याप्रकरणी इतर जे तीन आरोपी सुटलेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ. अशाप्रकारे नरेंद्र दाभोलकर यांचे विचार संपवता येत नाही. उलट मोठ्या निर्धाराने त्यांचं काम सुरूच आहे. ज्या विचारधारेवर दाभोलकर यांचा खून करण्याचा संशय होता त्यावर आजच्या न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब झालेलं आहे. मुळात या खुनाच्या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक झालेली नाही. बाकीचे जे सूत्राधार होते त्यांची आज सुटका झालेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाणार आहेत.’ असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

COMMENTS