Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव

अहिल्यानगर : प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगावच्या वतीने घेण्यात आलेल्या अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा

निलंगा बाजार समितीसाठी निधी उपलब्ध करून देणार
सामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका
 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

अहिल्यानगर : प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगावच्या वतीने घेण्यात आलेल्या अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा निशा लॉन्स येथे उत्साहात पार पडला. या परीक्षेचे हे 35 वे वर्ष होते. जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रात 3 हजार 694 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीक्षेत एकूण इयत्ता 4 थी, 5 वी, 7 वी व 8 वी मराठी व इंग्रजी माध्यमातील गुणवत्ता यादीत चमकलेल्या 491 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान (नगर केंद्र) चे अध्यक्ष दादारामजी ढवाण होते. तर प्रमुख वक्त्या विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या राष्ट्रीय मंत्री डॉ. मधुश्री सावजी या होत्या. डॉ. सावजी यांनी यश मिळवण्यासाठी वेळेला किती महत्व आहे. व संधीचा फायदा घेऊन भविष्य कसे उज्वल करावे? हे विद्यार्थ्यांना सांगितले. दादारामजी ढवाण यांनी संस्थेच्या कार्याचा आलेख उंच जाताना पाहून अतिशय आनंद होत असल्याचे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह सोमनाथ दिघे, सहकार्यवाह डॉ. रवींद्र चोभे, डॉ. रावसाहेब पवार, प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत, संदीप भोर, कुलकर्णी आदी उपस्थित होते. कौतुक सोहळ्याचे प्रास्ताविक प्रज्ञाशोध विभाग प्रमुख डॉ. अविनाश भांडारकर यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दादासाहेब काजळे यांनी करून दिला. तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावांची यादी वाचन डॉ. शर्मिला पारधे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली गांगर्डे व निकिता मोकाटे यांनी केले. आभार प्रा. विशाल जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. गोकुळदास लोखंडे, प्रा. विलास पांढरे, डॉ. प्रदीप शेळके, रूपाली ओक, प्रा. सौ. अनिता लवांडे, प्रा. सुनील वाकचौरे, दादासाहेब काजळे, मनीषा वर्पे, प्रमोद राणा, सतीश लवांडे, जयंत मुळे, दीपक आढाव, तेजस रोकडे, दर्शन राहींज आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS