Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. फुलारी डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू

छ. संभाजीनगर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलप

चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात – अंबादास दानवे
आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते 12 कोटी 12 लाख 70 हजार रुपयांच्या कामांचे लोकार्पण
समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

छ. संभाजीनगर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. डॉ. फुलारी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. राजभवनात 4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता पाच प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये पुणे विद्यापीठाचे दोन, कोल्हापूर विद्यापीठाचे दोन आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतील एका प्राध्यापकाचा त्यामध्ये समावेश आहे. राजभवनात प्रेझेंटेशन झाल्यानंतर 19 दिवसांनी डॉ. फुलारी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

COMMENTS