Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. संजय दवंगे यांची मुक्त विद्यापीठाच्या हिंदी साहित्य लेखनासाठी नियुक्ती

कोपरगाव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगांव येथील हिंदी विभागप्रमुख ड

*उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार l Lok News24*
अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ
कोपरगाव तालुक्यात काँग्रेस कमिटीचा जय भारत सत्याग्रह

कोपरगाव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगांव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील एम.ए. हिंदी शिक्षणक्रमातील अभ्यासक्रमाच्या स्वयं अध्ययन साहित्य लेखन कार्यासाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे.
या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. सध्या सर्वच विद्यापीठांमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले जात असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेमार्फत हिंदी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम विकसित करण्यात येत आहे. डॉ. संजय दवंगे यांचा अध्ययन अध्यापन व संशोधन क्षेत्रातील दीर्घ अनुभव व व्यासंग विचारात घेऊन त्यांची या कामी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय दवंगे हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांचे आतापर्यंत 24 शोधालेख मान्यताप्राप्त पत्रिकेत प्रकाशित झालेले असुन यूजीसी संस्थेअंतर्गत एक लघुशोध प्रबंध पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, शाखा कोपरगांव चे कार्याध्यक्ष म्हणुनही त्यांचे साहित्यिक कार्य प्रशसनीय आहे. विद्येचे माहेरघर म्हणुन ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचेही ते सदस्य आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ड. एस.डी. कुलकर्णी,  विश्‍वस्त मा. संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, सचिन धर्मापुरीकर उपसंपादक लोकमत कार्यालय कोपरगाव, पत्रकार लक्ष्मण जावळे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. संजय दवंगे यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS