Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी डॉ. अनिल गडाख यांची निवड

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेची निवडणूक शिर्डी येथे दि. 3

लातूर अर्बन को-ऑप बँकेला 20.75 कोटी नफा
भाजप नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे यांचे निधन
दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
Displaying WhatsApp Image 2025-12-01 at 17.17.09_c59ced94.jpg

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेची निवडणूक शिर्डी येथे दि. 30 नोव्हेंबर रोजी पार पडली. यासाठी राज्यभरातून १६२५ पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच सह आयुक्त पशुसंवर्धन हे मतदान करण्यासाठी उपस्थित होते. राजपत्रित पशुवैद्यक संघटना ही  राज्यस्तरावर पशुसंवर्धन विभागातील वर्ग -१  अधिका-यांच्या न्याय्य हक्कांसाठी  पाठपुरावा करण्याचे काम करत असते. या संघटनेच्या राज्याध्यक्षपदी अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गडाख यांची बहुमताने निवड झालेली आहे. त्यांच्यासोबत संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. मंदार मराठे (नागपुर ) व डॉ. उपेंद्र गायकवाड (नांदेड), उपाध्यक्षपदी डॉ‌. गणेश निटुरे (लातूर), दुर्गा मंच अध्यक्ष पदी डॉ. ललिता गावडे (पुणे) व उपाध्यक्ष पदी डॉ. जया राऊत (यवतमाळ), संपादक महाव्हेट जर्नल या पदावर डॉ. सचिन रहाणे (पुणे), नाशिक विभागीय सचिव पदी डॉ.योगेश मेहेरे ,  छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिव पदी डॉ. रंजीत शेजूळ , पुणे विभागीय सचिव पदी डॉ. अमोल येडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. डॉ. अनिल गडाख यांच्या रूपाने जिल्ह्यास पहिल्यांदाच राज्य अध्यक्ष पदाचा बहुमान प्राप्त झालेला आहे.
     या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी तसेच जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. उमेश पाटील यांनी डॉ. अनिल गडाख यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. अनिल गडाख यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित असलेल्या आस्थापनाविषयक बाबी, वेतन त्रुटी विषयक बाबींचा राज्यस्तरावर पाठपुरावा करून त्यांचा निपटारा करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले तसेच संघटनेच्या माध्यमातून  पशुपालकांना उद्योजक बनविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.

COMMENTS