Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितच्या वतीने डॉ आंबेडकरांची जयंती होणार जल्लोषात साजरी ः खरात

कोपरगाव प्रतिनिधी ः महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार 14 एप्रिल रोजी आलेली 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात कोपरगावात साजरी केली जाणार असल्

राज्य सरकारच्या विरोधात सुजय विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डीले बसले उपोषणाला (Video)
पंतगाच्या मागे धावताना 13 वर्षांच्या मुलाचा दम लागुन मृत्यू
नगरमधील व्यापारी एकजूट आता फुटीच्या उंबरठ्यावर ?

कोपरगाव प्रतिनिधी ः महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार 14 एप्रिल रोजी आलेली 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात कोपरगावात साजरी केली जाणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा मार्गदर्शक तथा उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात यांनी दिली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती नियोजनसंबधी शरद खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनिल बनसोडे, साईनाथ जाधव, सतीश गुंजाळ, बापुसाहेब ठोँबरे,मोहनराव शिरसाठ, संजय त्रिभुवन, वैभव राजगुरू, रंजणी लासे, शितल गोडगे, आशा शिरसाठ, सुनीता पाटोळे यांच्या सह सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी जाहीर करण्यात आली यात अध्यक्षपदी  विजयराव जाधव, उपाध्यक्षपदी  सुनीता मुंतोडे, संजय कोपरे, कार्याध्यक्षपदी संजय लोंढे, सेक्रेटरीपदी सविता वाघ तर खजिनदार पदी राजेंद्र मोकळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नवनिर्वाचित कमिटीचे जिल्हा मार्गदर्शक शरद खरात व संजय लोंढे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तसेच दिवंगत बाजीराव रणशूर याना वंचित आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

COMMENTS