Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. कुरुलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओ मधले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांची 14 दिवसांची पोलिस कोठडीची रिमांड मंगळवारी संपली. त्यानं

देवीला प्रसन्न करण्यासाठी बापाने दिली मुलीची बळी
राहुरी तालुक्यात आढळला वृद्ध महिलेचा विवस्त्र मृतदेह
अखेर शेतकर्‍यांनी घेतले आंदोलन मागे; तब्बल 378 दिवसांपासून सुरू होत आंदोलन

पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओ मधले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांची 14 दिवसांची पोलिस कोठडीची रिमांड मंगळवारी संपली. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. जाधव यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांची 29 मे पर्यंत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे. सरकारी वकील चंद्रकिरण साळवे यांनी डॉ. कुरुलकर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने कुरुलकर यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे डॉ.कुरुलकर यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे.

COMMENTS