Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांच्या उपस्थितीत डीपीआयचे कार्यकर्ता महाअधिवेशन!

अजिंक्य चांदणे : डीपीआय कार्यकर्ता महाअधिवेशनास उपस्थित राहावे

बीड प्रतिनिधी - डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सदरील महाअधिवेशन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

दीपिका कक्कर ने दाखवली आपल्या मुलाची झलक
राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा विचाराधीन
जम्मू-काश्मिरात पुन्हा एका जवानाला वीरमरण

बीड प्रतिनिधी – डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सदरील महाअधिवेशन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पुणे-सातारा रोड, पद्मावती रोड, पुणे येथे  शुक्रवार दि.19 मे रोजी दुपारी 2 होणार आहे. या महाधिवेशनास डीपीआय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केले आहे.
  या महाअधिवेशनाचे उदघाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहे. तसेच या महाशिवेशनाचे अध्यक्ष डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे भूषविणार आहेत. तसेच स्वागतध्यक्ष म्हणून डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे आहेत. तसेच या महाअधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व ज्येष्ट विचारवंत पदमश्री लक्ष्मण माने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी,2 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहण होणार असून दुपारी 2.30 वाजता शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी यांच्या नवयान महाजलस्याचा कार्यक्रम घेण्यास येणार आहे. या नंतर सायंकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यकर्ता महाअधिवेशनाचे उदघाटन हाऊन मुख्य सभेला सुरुवात होईल. सदर राज्यस्तरीय कार्यकर्ता महाअधिवेशनामध्ये विशेषतः मातंग समाजाच्या प्रश्नावर सखोल चर्चा होईल व स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील मातंग समाज सामाजिक, शैक्षनिक, आर्थिक क्षेत्रात का मागासलेला राहिला यावर देखील गंभीरपणे वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणे होणार आहेत व स्वातंत्रलाच आव्हान देणार्‍या काही प्रवृत्तीचा परमर्ष देखील घेतला जाणार आहे. या महाअधिवेशनास महाराष्ट्रातल्या कानकोपर्‍यातून डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा डेमो्क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

COMMENTS