Homeताज्या बातम्यासंपादकीय

नोटबंदीचा संशयकल्लोळ

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोटबंदी करण्याची घोषणा करत, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकातून बदलून घेण्यास परवानगी दिली आहे. ख

भावनिक राजकारणाचे बळी !
राज्यातील २८ महापालिका लोकशाहीविनाच !
चांद्रयानमुळे अवकाश खुले

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोटबंदी करण्याची घोषणा करत, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकातून बदलून घेण्यास परवानगी दिली आहे. खरंतर केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये अचानकपणे 500 आणि 1000  हजार रुपयांची नोटबंदी केली होती. त्याचबरोबर सरकारने नव्याने 500 च्या नोटा आणि दोन हजाराची नोट बाजारात आणली होती. मोठ्या रकमांच्या नोटा असल्यास भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे केंद्रसरकारने 500 आणि 1000 हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. लोक 10-20 रुपयांच्या नोटामध्ये काळा पैसा साठवू शकत नाही. मात्र त्याचबरोबर केंद्राने पाचशेच्या चौपट रकमेची अर्थात दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणली. यामुळे पाचशे रुपयाच्या चौपट लोक काळा पैसा दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये ठेऊ शकतात. मात्र दोन हजाराची नोट त्यांनी काढली आणि बाजारमध्ये आणली. यामुळे काळा पैसा वाढीस मदत मिळतो.
मोठ्या रकमेच्या नोटांमुळे भ्रष्टाचार वाढतो, मोठ्या नोटांच्या रकमांमुळे मोठा पैसा एका ठिकाणी ठेवणे शक्य होते, त्यामुळे मोठ्या रकमांच्या नोटाच नको, असा अर्थशास्त्राचा नियम असतांना, केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा बाजारात आणण्याचे धाडस दाखवले होते. आणि तब्बल 7 वर्षांनतर या नोटा पुन्हा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर जेव्हा सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, तेव्हाच सरकारने केवळ 500 च्या नव्या नोटा बाजारात आणण्याची गरज होती. आजमितीस बाजारातील गणित बघितले तर, 2000 हजारा रुपयांच्या नोटा किती छापल्या, त्यासाठी होणारा खर्च, त्याचे वितरण करण्यासाठीचा खर्च आणि आता पुन्हा या नोटा परत घेण्याचा निर्णय, त्या परत घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च विचारात घेतल्यास हा निर्णय पुन्हा फसलेला दिसून येतो. त्यातून केवळ वित्तहानी आणि सर्वसामान्यांना मानसिक त्रासाला सामौरे जावे लागणार असल्याचेच दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वीच 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. 30 एप्रिल 2023 पर्यंत 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्यामुळे त्याची भरपाई करावी लागणार आहे. दोन हजाराची नोट माघारी घेतल्यानंतर नोटांची चणचण भासू नये म्हणून अधिक छपाई करावी लागणार आहे. नोटाची छापाई होणारी नाशिकरोड आणि देवास येथील नोट प्रेसला जादा छपाईचे उद्दीष्ट दिले आहे. नाशिक रोडला तीन महिन्यांत पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छपाईचे उद्दिष्ट दिले आहे. देवास येथील नोट प्रेसमध्ये रोज 2.20 कोटी नोट छापण्याचे लक्ष दिले आहे. सध्या या प्रेसमध्ये 500 रुपयांबरोबर 200, 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटा छापल्या जात आहेत. त्या नोटींची छपाई सुरु राहणार आहे. नोटबंदीमुळे छपाईचा मोठा खर्च वाढला आहे. शिवाय नोट छपाई करणार्‍या कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुट्टया देखील रद्द केल्या आहेत. देवासमध्ये कर्मचार्‍याचे कामाचे तास 22 केले गेले आहे. कर्मचारी 11-11 तासांच्या शिफ्टमध्ये काम करणार आहे. यापूर्वी कर्मचारी नऊ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत होते. म्हणजे त्यात दोन तास वाढवण्यात आले आहे. देवास येथील नोटप्रेसमध्ये 1,100 कर्मचारी कार्यरत आहे. नाशिकमधील प्रेसमध्ये एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी नोटांची छपाई झाली आहे. 31 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील.

COMMENTS