चारित्र्याचा संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सूनेकडून खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्याचा संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सूनेकडून खून

अहमदनगर/प्रतिनिधी : चारित्र्यावर संशय घेणार्‍या सासर्‍याचा सूनेनेच खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात मंगळवारी सकाळी घ

विखेंची पात्रता विचारणार्‍या थोरातांनी आत्मपरीक्षण करावे
ग्रामपंचायतींचा धुराळा जोरात, दोन हजार जागांसाठी चौपट उमेदवार
निवारा बालगृह समाजाला दिशा देणारे ठिकाण ः आमदार सुरेश धस

अहमदनगर/प्रतिनिधी : चारित्र्यावर संशय घेणार्‍या सासर्‍याचा सूनेनेच खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात मंगळवारी सकाळी घडली.अर्जुन गोविंद हजारे (वय 62 रा. चिचोंडी पाटील) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की  अर्जुन हजारे हे त्यांची सून ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले. भाऊ गुजाबा हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण सुरू होते. या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुर्‍हाडीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला आहे.   दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी ज्योती हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी बाबासाहेब चंदु बनकर ( वय.42 राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर )  यांच्या फिर्यादीवरून पुण्याची नोंद केली असून  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे.

COMMENTS