मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त आयोजित उत्सव आणि मिरवणुक सोहळ्याच्या आनंदावर
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त आयोजित उत्सव आणि मिरवणुक सोहळ्याच्या आनंदावर राज्य शासनाने परवानगी नाकारून विरजण टाकू नये. कोरोना साथीमुळे 2 वर्षे भीम जयंतीच्या सार्वजनिक उत्सवात खंड पडला होता. याबाबत आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. यंदा मात्र भीम जयंतीची परवानगी नाकारू नये. यंदा गुढीपाडवा, शिवजयंती मिरवणूक निघाल्या. राज्यात भीमजयंतीची मिरवणूक अडवू नये. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे. आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावू नयेत याची राज्य शासनाने काळजी घ्यावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य शासनाला केली आहे. सोलापूरची भीम जयंतीची मिरवणूक राज्यात प्रसिद्ध आहे. देशात आंबेडकरी जनता दि.14 एप्रिल ला भीम जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते. यंदा राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारली जात असल्याच्या तक्रारी रामदास आठवले यांच्याकडे आल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकांना परवानगी देण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्याची मागणी केली आहे.
COMMENTS