Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवनात आनंद कमी होऊ देऊ नका ः समाधान महाराज शर्मा

मुसळधार पावसात कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती

शेवगाव तालुका ः जीवनात कितीही उलथापालथ झाली तरी आनंद कमी होऊ देऊ नका. कारण, सद्यस्थितीत माणूस अपसेट आहे. तो सेट होण्यासाठी कथा, कीर्तनाच्या माध्य

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश ; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा
कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार
कुंभमेळ्यातून आलेल्यांचीही क्लिप घंटागाडीवर लावावी

शेवगाव तालुका ः जीवनात कितीही उलथापालथ झाली तरी आनंद कमी होऊ देऊ नका. कारण, सद्यस्थितीत माणूस अपसेट आहे. तो सेट होण्यासाठी कथा, कीर्तनाच्या माध्यमातून त्याच्या शरीराची सर्विसिंग करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन शिवपुराण कथाकार प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी केले. लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबानगर मैदानावर आयोजित महाशिवपुराण कथेचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सुरू होण्याआधी शेवगाव शहर व पंचक्रोशीत जोरदार पाऊस झाला. मात्र, श्रोत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.तर,पर्जन्य राजाचे वर्णन करतांना शर्मा महाराजांनी महादेवाची कथा ऐकायला साक्षात गंगा आल्याचे सांगितले. शर्मा महाराज पुढे म्हणाले, सर्कस मधील कलाकारांना प्रेक्षकाच्या आनंदासाठी स्वतःची सुखदुःखे बाजूला ठेवून कसरती कराव्या लागतात. तद्वतच अध्यात्म क्षेत्रातील कथा, कीर्तनकारांनाही आपले दुःख बाजूला ठेवून समाजातील अवगुण दूर करण्यासाठी समाज प्रबोधन करावे लागते.गुरु तपासायचा नसतो तर, गुरु प्राप्तीसाठी ईश्‍वरावर निष्ठा ठेवावी लागते.असे सांगून त्यांनी जीवनात तुम्ही एकटे असू द्या पण, तुमच्या सोबत गुरु असल्यास काहीही कमी पडत नाही.शर्मा महाराज म्हणाले. कथा श्रवण करण्यासाठी व्यासपीठावर तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, नूतन देशमुख, राजश्रीताई घुले, आमदार आशुतोष काळे, चैताली काळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवपार्वती कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. यांनी कथेच्या नेटक्या नियोजनाचे कौतुक करून घुले परिवाराला आशीर्वाद दिले. त्यानंतर विशेष निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली.

COMMENTS