Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त दिली देणगी

संगमनेर/प्रतिनिधी ः पारंपारिक रूढी परंपरांना फाटा देत व दुःखाला आवर घालत आईने दिलेली  शिकवण अंमलात आणत सामाजिक जाणिव व संवेदना जागृत ठेवत शिक्षक

अमृतवाहिनी आयटीआयच्या 256 विद्यार्थ्यांना नोकरी
ठाकरेंच्या समर्थनार्थ जिल्हा शिवसेनेचा उद्या नगरला मेळावा
मुख्याधिकारी यांच्या नावाने लाच मागणारा लिपिक लाचलचुपतच्या जाळयात

संगमनेर/प्रतिनिधी ः पारंपारिक रूढी परंपरांना फाटा देत व दुःखाला आवर घालत आईने दिलेली  शिकवण अंमलात आणत सामाजिक जाणिव व संवेदना जागृत ठेवत शिक्षक  सुनील व अनिल कडलग यांच्यासह लता, पुष्पा व उषा यांनी आई स्व. शकुंतला किसन कडलग यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक संस्थांना देणगी देऊन व विचारवंत प्रा. सोपानराव देशमुख यांचे व्याख्यानाचा जागर  आयोजित करून प्रेरणादायी कार्य केले आहे.
रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्‍वस्त व जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे संस्थापक सुनील कडलग आणि आधार संस्थेमार्फत सामाजिक काम करणारे अनिल कडलग यांची आई शकुंतला किसन कडलग यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवार 8 रोजी येथील कृष्णा कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. आयुष्यभर सामाजिक जाण व भान जपणार्‍या आईचा स्मृती जागर हा प्रा. सोपानराव देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करून व जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयास रुपये 21 हजाराची देणगी आणि अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करणार्‍या आधार या सामाजिक संस्थेला 11 हजाराची देणगी देऊन आईची स्मृती जतन करण्याचा निर्णय सुनील कडलग, अनिल कडलग व त्यांच्या भगिनी लता कवडे, पुष्पा देशमुख आणि उषा मोराडे आणि वृषाली व मंदा कडलग यांनी घेतला. याप्रसंगी सामाजिक संस्थांना जी मदत करण्यात आली त्यात लता कवडे, पुष्पा देशमुख, उषा मोराडे यांनीही हातभार लावला. याप्रसंगी वृषाली कडलग, मंदा कडलग उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल कडूसकर यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच निलेश कडलग यांनी केले. स्व.शकुंतला किसन कडलग यांचे आगळे वेगळे पुण्यस्मरण उपक्रम समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरला आहे.

COMMENTS