Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरआयटीच्या एआयसीटीई आयडिया लॅबला 72 लाखांची देणगी

कल्याणी ग्रुप, किर्लोस्कर लिमिटेड, झंवर ग्रुपसह केपीटीचाही समावेशइस्लामपूर / प्रतिनिधी : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या स्वायत्त

पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांना साश्रूनयनांनी निरोप ; चिंचेवाडी येथे अंत्यसंस्कार; सोमवारी रक्षाविसर्जन
गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
राजारामबापू कारखाना अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड; उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष विजयराव पाटील

कल्याणी ग्रुप, किर्लोस्कर लिमिटेड, झंवर ग्रुपसह केपीटीचाही समावेश
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयाचे उद्योग जगताबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. महाविद्यालयाच्या एआयसीटीई निधीप्राप्त एआयसीटीई-आरआयटी आयडिया लॅब उभारणीसाठी कल्याणी ग्रुप, पुणे, किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्करवाडी, झंवर ग्रुप, कोल्हापूर आणि कुलकर्णी पॉवर टूल्स, शिरोळ या प्रसिध्द उद्योग समूहांकडून आरआयटी महाविद्यालयास 72 लाखाचा निधी देणगी स्वरूपात देण्यात आला.
संशोधन आणि विकास अधिष्ठाता व आयडिया लॅबचे समनव्यक डॉ. आनंद काकडे म्हणाले, अमित कल्याणी, उपव्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज, संजय किर्लोस्कर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, नीरज झंवर, कार्यकारी संचालक, झंवर ग्रुप, कोल्हापूर, नितीन झंवर, व्यवस्थापकीय संचालक, आष्टा लाइनर, आष्टा, प्रकाश कुलकर्णी, कार्याध्यक्ष, कुलकर्णी पॉवर टूल्स, शिरोळ आणि प्रभा कुलकर्णी, संचालक, कुलकर्णी पॉवर टूल्स, शिरोळ यांनी वैयक्तीकरित्या एआयसीटीई-आरआयटी आयडिया लॅबमध्ये रस घेतला. ते आरआयटीच्या प्रगतीमुळे आणि आयडिया लॅबच्या संकल्पनेने प्रभावित होऊन त्यांच्या उद्योगांच्या वतीने 72 लाख रुपये देणगी स्वरूपात दिली. थोड्याच दिवसापूर्वी आरआयटी महाविद्यालयाची भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेच्या एआयसीटीई निधीप्राप्त एआयसीटीई-आयडिया लॅब (आयडिया डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएअशन अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन) ही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निवड झाली होती. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या मूलभूत तत्वांच्या अनुभवासाठी आणि त्यांच्यामध्ये उत्पादक दृष्टी निर्माण करण्यासाठी अभिनव प्रयोगशाळेची स्थापना केली जाणार आहे. संपूर्ण भारतातून 250 अर्जापैकी 49 संस्थांची निवड झाली आहे. आरआयटी ही संस्था महाराष्ट्रातून निवडलेल्या 5 संस्थापैकी एक आहे.
या योजनेसाठी एआयसीटीईकडून 45 लाखाचा निधी प्राप्त झाला. उर्वरित 60 लाख रुपयाचा निधी महाविद्यालय, माजी विद्यार्थी आणि परिसरातील उद्योग समूहाकडून जमा करायचा होता. यावेळी आरआयटीचे संशोधन आणि विकास अधिष्ठाता व आयडिया लॅबचे समनव्यक डॉ. आनंद काकडे यांनी मान्यवरांना आयडिया लॅबची कार्य प्रणाली आणि त्याचा अभियंता आणि नव उद्योजकांना होणार्‍या फायद्याविषयी माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे संशोधन आणि उद्योजकता विकासातील योगदान याविषयी सादरीकरण केले. आरआयटीच्या संचालिका डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी यांनी आरआयटीबद्दल थोडक्यात परिचय करून दिला. तसेच आरआयटीचा एका छोट्या ग्रामीण तांत्रिक संस्थेपासून जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि कौतुकास्पद स्वायत्त तांत्रिक संस्थेपर्यंत झालेल्या 37 वर्षांतील प्रगतीचा उल्लेख केला. तसेच त्यांनी सर्व उद्योग समूहाच्या प्रमुखांचे आभार मानले. महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील, आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील आणि कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत यांनी संपूर्ण आयडिया लॅब टीम आणि नेत्रा आरआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी तसेच नेत्रा आरआयटीचे व्यस्थापक हर्षल पाटील यांचे अभिनंदन केले.

COMMENTS