अतिरिक्त ऊसाचे पंचनामे करा ; शेतकरी शिष्टमंडळाची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिरिक्त ऊसाचे पंचनामे करा ; शेतकरी शिष्टमंडळाची मागणी

पुणतांबा प्रतिनिधी : शेतकर्‍यांचे गाळप विना ऊस शिल्लक असून त्या शिल्लक उसाचा पंचनामा त्वरित करण्यात यावा त्याचा आदेश संबंधित तहसीलदार यांना देण्यात य

पवार-ठाकरेंची ‘वर्षा’वर खलबते
नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे
स्वनिर्मित पाऊलवाट नशीब बदलवते ःसुप्रिया कर्णिक

पुणतांबा प्रतिनिधी : शेतकर्‍यांचे गाळप विना ऊस शिल्लक असून त्या शिल्लक उसाचा पंचनामा त्वरित करण्यात यावा त्याचा आदेश संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पुणतांबा येथील किसान क्रांती च्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी आश्‍वासन दिले होते की 15 जून नंतर ज्या शेतकर्‍यांच्या उसाला तोड मिळाली नाही त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देऊन अनुदान देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार पुणतांबा परिसरात अंदाजे पंचवीस एकर ऊस शिल्लक असून शिल्लक असल्यामुळे पुढील खरिपाचे पीक शेतकर्‍यांना घेता येणार नाही त्यासाठी ज्या शेतकर्‍यांच्या ऊस उभा आहे त्याचा त्वरित पंचनामा व्हावा व तसा आदेश संबंधित तहसीलदार सर्कल कामगार तलाठी यांना देण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग मिलिंद भालेराव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली त्यात म्हटले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसान क्रांतीच्या पदाधिकार्‍यांना शिल्लक उसाचा बाबत शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येईल त्यासाठी शेतकर्‍यांचा उसाचा पंचनामा होणे गरजेचे आहे त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे म्हणजे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. ज्या शेतकर्‍यांच्या शेतात ऊस उभा आहे त्यांनी आपल्या स्मार्ट फोन द्वारे फोटो काढून त्याची नोंद करावी असे आव्हान बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. प्रादेशिक सहसंचालक यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी ज्या चर्चेत बाळासाहेब चव्हाण मुरलीधर थोरात अशोक बोर बने दीपक नवले गीताराम वायकर आदी शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS