Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजाला दिशा देण्याचे काम ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी केले : माजी न्यायमूर्ती बी. एच. मरलापल्ले

अंबाजोगाई प्रतिनिधी - पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास प्रवृत्त

देशभरात कोरोनाचे 305 नवे रूग्ण
पवारांचे संभ्रमाचे राजकारण
लष्कराच्या अधिकार्‍याला पोलिस ठाण्यात मारहाण

अंबाजोगाई प्रतिनिधी – पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास प्रवृत्त करणे अशी अनेक समाजाला दिशा देणारी कामे ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी केली असे प्रतिपादन मुंबई उच्चन्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एच. मरलापल्ले यांनी केले. येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वरराव काळदाते (आबा) (मालक) इस्थळकर हे वयाच्या नव्वदीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्ताने रविवारी मानवलोकच्या सभागृहात त्यांच्या अभिष्टचिंतन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात न्या. बी. एच. मरलापल्ले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंदराव गोरे (चेअरमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, कैसेगाव, धाराशिव),तर व्यासपीठावर प्राचार्य. अनिरुध्द जाधव (लातूर पॅटर्न’ चे जनक), डॉ. प्रविण शिनगारे (माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य,बी. बी. ठोंबरे, नंदकिशोर मुंदडा,आण्णासाहेब खंदारे,अंकुश भालेराव,शंकर खराटे,अँड.एन.एम.जाधव,भागवत गोरे, पृथ्वीराज साठे,राजकिशोर मोदी,संयोजन समितीचे जी. जी. रांदड, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, दगडू लोमटे, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. एस. के. जोगदंड, संभाजी रेड्डी,
रजनी काळदाते, अनिकेत लोहिया ,एस. बी. सय्यद, अविनाश भालेकर उपस्थित होते. या वेळीं बोलताना न्यायमूर्ती बी. एच. मरलापल्ले म्हणले की समाजात तत्वनिष्ठ,निस्पृह मना काम करणारी व्यक्तिमत्व दुर्मिळ होत चालली आहेत. ज्ञानेश्वरराव काळदाते नी आपल्या एकत्रित कुटुंबासह पंच क्रोशीतील ग्रामस्थांचा विचार केला. त्यांच्या प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.अनेक कामे केली.पण कधीही श्रेय घेतले नाही.असे निस्वार्थी काम समाजात झाले पाहिजे.अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच त्यांनी स्व.बापूसाहेब काळदाते यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत अनेक प्रसंग सांगितले. निवृत्त वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रविण शिनगारे म्हणाले, ज्ञानेश्वर काळदाते यांचे सुदैवी दीर्घायुष्य असे भाग्य लाभलेले व्यक्तीमत्व आहे. याची देही याच्या डोळा या अभंगाप्रमाणे त्यांच्या डोळ्यात आनंद दिसल्याच्या भावना डॉ.शिनगारे यांनी व्यक्त केल्या. नंदकिशोर मुंदडा म्हणाले, शेती व मातीशी नाते असलेले ज्ञानेश्वर काळदाते मालकांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी नाती जपत गावाचे गावपणही जपले. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे मालक हे नाव पडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्ञानेश्वर काळदाते यांनी नितीमत्ता हिच सर्वोच्च मानली. वारकरी संप्रदाय व सेवा दलाच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाल्याचे प्राचार्य जाधव म्हणाले. मुल्याची जोपासना करीत आयुष्याची वाटचाल करणारे व्यक्तीमत्व ज्ञानेश्वर काळदाते यांचे असल्याच्या भावना अरविंदराव गोरे यांनी व्यक्त केल्या.

COMMENTS