घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग

अहमदनगर/प्रतिनिधी : दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या महिलेला तिच्या पतीने मोटारसायकल आडवी घालून अडविले आणि तिला शिवीगाळ करून व तिचा हात धरुन तिच्याशी अश्‍

Sangamner : प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी
विद्यार्थ्यांकडून व्यावसायिकांची मुलाखत
हद्दपार असताना शहरात फिरणार्‍या एकास पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी : दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या महिलेला तिच्या पतीने मोटारसायकल आडवी घालून अडविले आणि तिला शिवीगाळ करून व तिचा हात धरुन तिच्याशी अश्‍लील बोलून तिचा विनयभंग केला. ही घटना नगर-कल्याण रोडवर घडली. पारनेर एका गावात राहणारी 28 वर्षीय महिला पोलिस ड्युटी संपल्यानंतर तिच्या दुचाकीने नगर कल्याण रोडने घराकडे जात असताना रस्त्यामध्ये तिच्या घटस्फोटीत पतीने तिला मोटार सायकल आडवी घालवून थांबवले आणि तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करुन तिचा हात धरुन म्हणाला की, तू अशी का करते? तू परत माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असे म्हणून तो तिच्या अंगाशी झटू लागला व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी महिलेने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने तिला मारहाण केली. यावेळी ती ओरडल्याने लोकांची गर्दी जमा झाली व त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS