Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैष्णवी चौकात रविवारी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार 19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आ

आर.जे.एस नर्सिंग कॉलेज मध्ये फाळणी वेदना स्मृतिदिन उत्सहात साजरा.
दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद
महात्मा ज्योतीबा फुलेची जयंती साधेपणाणे साजरी करा – काळे

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार 19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळावा या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य गटास प्रथम पारितोषिक 11001 रु. मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ शशिकांत संसारे, द्वितीय पारितोषिक 7001 रुपये मुंबई येथील पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सामूहिक नृत्य लहान गट प्रथम पारितोषिक 7001 रुपये सत्यजित कदम फाउंडेशचे, अजित चव्हाण व भारत शेटे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 5001 रुपये अनिल डोळस यांच्याकडून दिली जाणार आहेत. सोलो नृत्य मोठा गट प्रथम पारितोषिक 7001 रुपये साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, द्वितीय पारितोषिक इलेक्ट्रिकलचे अमोल तुरकणे, प्रशांत डुक्रे, संदीप निभे तर तृतीय पारितोषिक 4001 ऋषिकेश इंटरपायजेसचे निखिल कुर्‍हाडे यांच्याकडून सौजन्य केली जाणार आहे. सोलो नृत्य लहान गटास प्रथम पारितोषिक 5001 हारून पठाण, द्वितीय पारितोषिक 4001 रुपये स्वराज्य उद्योग समूहाचे वतीने, तृतीय पारितोषिक 3001 रुपये कदम पेंट्स चे प्रसाद व सचिन कदम तर चतूर्थ 2501 रुपये साई अर्णव सॉमिलचे जालिंडर दौंड यांच्याकडून दिली जाणार आहे.

COMMENTS