Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहित खुर्द केंद्रात आशाए’ मार्फत शालेय साहित्याचे वाटप

अकोले ः आशाए इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांचे मार्फत शनिवार दिनांक 06 जुलै रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कुल बॅग व स्कुल किट  आदी शालेय  

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा
सर्वसामान्यांचे प्रेम हेच खरे समाधान ः प्राचार्य शिवाजीराव भोर
विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट

अकोले ः आशाए इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांचे मार्फत शनिवार दिनांक 06 जुलै रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कुल बॅग व स्कुल किट  आदी शालेय  साहित्याचे  वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व सदस्यांनी केंद्रातील सर्व शाळांवर जाऊन स्कूल किट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. संस्थेचे अध्यक्ष शशांक शेट्टी, अविनाश शिंदे, योगेंद्र शुक्ला, महेश कामत, मयंक बिहानी, अभिजीत शेट्टी, आशिष पाटील, स्वप्निल जाधव, मोनी पाणीकर आदी सदस्य उपस्थित होते.
स्कूल बॅग व स्कूल किटच्या वाटपानंतर लहीत खुर्द केंद्रातील प्राथमिक शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने आशाए टीमच्या सर्व सदस्यांचा सत्कार केला यावेळी. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हरिश्‍चद्र शिंदे होते. यावेळी खास मुंबईहून गावचे भूमिपुत्र डॉ. राजू शिंदे व डॉ सुधाकर शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख वाल्मीक बडे यांनी केले.इयत्ता सहावीच्या ओम गोडसे यांने आपले मनोगत व्यक्त करत आशाए प्रति आभार व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने अजित दिघे यांनी मनोगत व्यक्त करत आशाए ला धन्यवाद व्यक्त केले. यावेळी गावच्या सरपंच अनिता गोडसे,उपसरपंच भारत गोडसे व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन फुलसुंदर व संदीप बर्वे यांनी केले तर आभार डॉक्टर किशोर गोडसे यांनी मांडले लहित केंद्रातील शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS