Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मा. नामदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप.

  कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्री शरद आंबिलवादे यांनी मानले व सूत्रसंचालन श्री सुनिल वाघमारे यांनी केले.

कोपरगाव प्रतिनिधी- जनता इंग्लिश स्कूल संवत्सर या ठिकाणी रयत शिक्षण संस्था, सातारा, उत्तर विभाग सल्लागार मंडळचे विभागीय अध्यक्ष मा. नामदार आशुतोष

छ. संभाजीराजांचे शौर्य शत्रुला धडकी भरवणारे
शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा लौकिक वाढवा
आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद
 कोपरगाव प्रतिनिधी- जनता इंग्लिश स्कूल संवत्सर या ठिकाणी रयत शिक्षण संस्था, सातारा, उत्तर विभाग सल्लागार मंडळचे विभागीय अध्यक्ष मा. नामदार आशुतोषदादा काळे(Ashutosh Dada Kale) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा दिलीपराव बोरनारे(Diliprao Bornare) पा. यांच्या वतीने विद्यालयातील गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात कै. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या विचारांचा वारसा मा. नामदार आशुतोषदादा काळे अखंड पणे पुढे नेत असून त्यातून सामाजिक विकास साधण्यासाठी ते कटीबद्ध आहेत असे सांगून मा. नामदार आशुतोषदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंदे भगवान यांनी करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमेश मोरे(Ramesh More) यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचा त्यांच्या शैक्षणिक विकासात वाढ होईल असे सांगून सर्वांचे ऋण व्यक्त केले. अॅड. शिरीषकुमार लोहकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रन फॉर हेल्थ या स्पर्धतील विद्यालयातील द्वितीय विजेती कु आश्विनी नेहे, तृप्ती आचारी, आशा रानोडे, शितल पगारे यांचे कौतुक व सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब बारहाते पा., माजी व्हाईस चेअरमन उद्धवराव बोरावके पा., विजयराव भोसले, अशोकराव बोरनारे, सुनिल कुहिले, भानुदास म्हस्के, बाबासाहेब कासार, तुषार बारहाते, बाळासाहेब जगताप, पांडुरंग भोसले, अविनाश ससाणे, गुलाबभाई शेख, महेश काळे, शिवाजीराव बोरनारे, दिपक वालझाडे, लक्ष्मणराव निरगुडे, अखिलेश भाकरे, राजेंद्र भाकरे, बाळासाहेब भारुड, भानुदास निकम तसेच अनेक ग्रामस्थ,विद्यालयाचे सेवकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्री शरद आंबिलवादे यांनी मानले व सूत्रसंचालन श्री सुनिल वाघमारे यांनी केले.

COMMENTS