आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव वाघातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव वाघातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी : निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयाच्या गरजू विद्यार्थ्यांना आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य

रिक्षात बसलेल्या प्रवाशी महिलेची पर्स पळवली
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत
शेतीसाठी वीज पुरवठा खंडित करू नका

अहमदनगर/प्रतिनिधी : निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयाच्या गरजू विद्यार्थ्यांना आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार लंके यांच्या संकल्पनेतून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते ना. अजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
आमदार लंके यांनी निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्याकडे शैक्षणिक साहित्य सुपुर्द केले. ते नुकतेच गावातील शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, भानुदास लंगोटे, तेजस केदारी आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सामाजिक भावनेने आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना आधार दिला जात आहे. कोरोनाच्या काळात आमदार निलेश लंके सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे राहिले. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान सुरु असून, गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी शिवा कराळे, संदीप चौधरी, हरीदास जाधव आदींसह आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS