Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप

इस्लामपूर / प्रतिनिधी : शेतकर्‍यांना उत्पन्नाचे एक नवे साधन निर्माण व्हावे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात शेतकर्‍यांचा हातभार लागावा, या भावनेने राजा

पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा
माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

इस्लामपूर / प्रतिनिधी : शेतकर्‍यांना उत्पन्नाचे एक नवे साधन निर्माण व्हावे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात शेतकर्‍यांचा हातभार लागावा, या भावनेने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. कारखान्याच्या सर्व गटावर सभासद शेतकर्‍यांना आंबा, नारळ, चिंच, लिंब,पेरू आदी फळझाडांचे वाटप केले जाणार आहे. मात्र, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर इस्लामपूर, बोरगाव येथील काही शेतकर्‍यांना प्रातिनिधिक स्वरूपात फळझाडांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, दादासो मोरे, सौ.मेघा पाटील, शैलेश पाटील, अमरसिंह साळुंखे, राजकुमार कांबळे तसेच मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, कारखान्याचे गटाधिकारी, कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते. ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील, गार्डन इनचार्ज श्रीकांत पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

COMMENTS