Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लायन्स क्लब कोपरगावतर्फे 100 कुटूंबाना दिवाळी फराळाचे वाटप

कोपरगाव ः ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही देणे लागतो या सामाजिक भावनेतून तयार झालेला लायन्स क्लब संपूर्ण जगामध्ये सामाजिक कार्य करण्यात

झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…
कुणबी नोंदी शोधण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात विशेष मोहीम
ज्यांनी जीवन घडविले तेच माझ्या लेखनाचे आदर्श : डॉ. बाबुराव उपाध्ये

कोपरगाव ः ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही देणे लागतो या सामाजिक भावनेतून तयार झालेला लायन्स क्लब संपूर्ण जगामध्ये सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहे. याच इंटरनॅशनल क्लबचा एक भाग म्हणजे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव असून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव हा मागील गेल्या 53 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यामध्ये समाजसेवेचे काम करत आहे.
यावर्षी लायन सुमित भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली क्लब तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला त्यामध्ये कोपरगाव शहरातील विविध भागातील गोरगरीब कुटुंबांना दिवाळी आनंदाने साजरी करता यावी व त्यांच्या चेहर्‍यावर हसू दिसावे या उद्देशाने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी जवळजवळ शंभर पेक्षा जास्त कुटुंबांना हे फराळ वाटप करून त्या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा तसेच त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न लायन्स क्लब ऑफ कोपरगाव तर्फे करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष सुमित भट्टड, सचिव प्रसाद भास्कर,खजिनदार अभिनंदन शिंगी, तसेच लिओ क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष पृथ्वी शिंदे, सचिव हर्षल कृष्णानी, खजिनदार जय बोरा आणि लीनेस क्लब कोपरगावच्या अध्यक्ष अस्मिता लाडे, सचिव अंजली थोरे, खजिनदार नेहा बत्रा याशिवाय राम थोरे, संदीप राशिनकर, आनंद लोढा, वर्षा झंवर, रोशनी भट्टड, भावना गवांदे आदी सदस्य उपस्थित होते.

COMMENTS