Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाज कल्याण बीड सौ.के.एस.के.महाविद्यालय,बीडयांच्या संयुक्त विद्यमाने जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण संपन्न

बीड प्रतिनिधी - सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.दीपा क्षीरसागर संस्था उपाध्यक्ष व प्राचार्य डॉ.श

सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात
बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके

बीड प्रतिनिधी – सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.दीपा क्षीरसागर संस्था उपाध्यक्ष व प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालय व समाजकल्याण कार्यालय,बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जात वैधता प्रमाणपत्राचे  वितरण करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीश माऊलगे तसेच समाज कल्याण कार्यालयाचे समतादूत म्हणून गुजर सर, मस्के सर, गायकवाड विजय, उगले प्रशांत  उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.सय्यद लाल विद्यार्थ्यांना व पालकाना बोलताना म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्र हे जातीचा पुरावा दर्शविणारे खूप आवश्यक प्रमाण आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय,अभियांत्रीकी इत्यादी प्रवेशासाठी  या प्रमाणपत्राची अतिआवश्यकता असते.विद्यार्थ्याला त्रास होऊ नये म्हणून समाजकल्याण कार्यालय,बीड व सौ.के.एस.के.महाविद्यालय बीड प्रतिवर्षी हा उपक्रम राबवत विद्यार्थ्याना याचे वितरण करतात. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बीड दिनांक 1 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या महिण्यात समानसंधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत व्यसनमुक्ती व शिष्यवृत्ती योजना मार्गदर्शन शिबीर देखील राबवण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS