डिसले गुरुजी राजीनाम्यावर ठाम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिसले गुरुजी राजीनाम्यावर ठाम

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांच्याकडे आता १५ दिवस आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणव

कर्जबुडव्यांना अनुदान अन् घरगुती गॅस धारकांना महागाईदान
गळ्यात टांगा भोंगा
महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांच्याकडे आता १५ दिवस आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर डिसलेंनी शिक्षण आयुक्तांकडे बाजू मांडली. पण, दोन चौकशी समित्यांच्या अहवालानुसार प्रतिनियुक्तीच्या काळात डिसले हे ना शाळेवर ना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर होते. त्यामुळे कारवाई होणारच असल्याने ते अजूनही राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत. पण, त्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून काही दिवसांत कारवाईतून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे ते शेवटच्या टप्प्यात राजीनामा मागे घेतील, असे बोलले जात आहे. सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या नियोजनात व्यस्त असलेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आता कोणताही निर्णय घ्यायला वेळ नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर डिसले गुरुजीदेखील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहात असल्याचे बोलले जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिक्षणमंत्री कोण होणार, याकडेही सर्वांचे विशेष लक्ष आहे.

COMMENTS