Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नस्ती उपलब्ध नसल्यास शिस्तभंगाची कारवाई – शिक्षण उपसंचालक उकिरडे

अहमदनगर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण

अशोक सोनवणे/अहमदनगर ः ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात बोगस शिक्षक भरतीद्वारे धुमाकूळ घालत शिक्षण विभागाला काळीमा फासण्याचे काम सुरू आहे. राज्यात श

कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांचा बोगस टेंडरचा महाघोटाळा
सचिव सुमंत भांगेचा एक हजार कोटींचा भोजनठेका घोटाळा ?
सार्वजनिक बांधकाम विभागात हजारो कोटींचा टेंडर घोटाळा

अशोक सोनवणे/अहमदनगर ः ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात बोगस शिक्षक भरतीद्वारे धुमाकूळ घालत शिक्षण विभागाला काळीमा फासण्याचे काम सुरू आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी असतानाही नगर जिल्ह्यात शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) कक्ष अधीक्षक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरभरती केलेली आहे. याबाबत दैनिक लोकमंथनने सहा दिवस हा झालेला गैरप्रकार उजेडात आणण्यासाठी मालिका प्रकाशित केली. त्याची शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी दखल घेऊन पूर्वीची त्रिसदस्य समिती शुक्रवार दि. 19 मे रोजी अहमदनगर माध्यमिक विभागाकडून नस्ती ताब्यात घेणार आहे. मात्र नस्ती देण्यास पूर्वीप्रमाणेच चालढकल करुन शिक्षणाधिकारी आणि कक्ष अधिकारी यांनी नस्ती उपलब्ध करुन न दिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल )1979 मधील तरतुदीनुसार प्रशासकीय शिस्तभंग कारवाई करुन  तत्काळ गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती औदुंबर उकीरडे शिक्षण उपसंचालक पुणे यांनी दैनिक लोकमंथनशी बोलतांना दिली.

        संपुर्ण राज्यात सन 2012 पासुन शिक्षक भरतीप्रक्रियेला स्थगिती असताना बनावट दस्तऐवज बनवुन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी आणि उपसंचालक यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार करुन पदभरती केली. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करुनही शासकीय टेबलांवर कागदी घोडे नाचवली गेली मात्र अद्याप कारवाईची गोळाबेरीज शून्यच होती.त्यामुळे याबाबत दैनिक लोकमंथनने या गैरव्यवहाराचा पाठपुरावा करुन मालिका प्रकाशित केली. आता कुठेतरी शालेय शिक्षण विभाग, भ्रष्ट अधिकारी, संस्थाचालक,बोगस शिक्षकांचे धाबे दणाणलेले असुन आता कारवाई होणारच असा सुर उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी आळवला असला तरी या गैरव्यवहाराबाबत त्यांनीच गतकाळात नेमलेल्या चार चौकशी समित्यांची कामगिरी शून्य होती.

      शालेय शिक्षण विभागाने यापुर्वीच नगरचे भ्रष्ट शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी यांचेवर आरोप निश्‍चित करुन गुन्हा नोंदवणे अपेक्षित होते. मात्र बरबटलेले हात कदाचित त्यावेळी धजावले नसतील अशी प्रत्येकाच्या मनाला लागलेली चाहुल आहे.अक्षरशः शिक्षण विभागाकडे तक्रारींचा खच पडूनही अधिकारी वर्ग आजपर्यंत एकमेकांना पाठीशी घालण्यात वेळ मारुन नेलेला आहे.विधानसभेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित होऊनही भ्रष्ट शिक्षणाधिकारी तक्रारींत तथ्य नसल्याचा खुलासा निर्ल्लजपणाने करुन शिक्षणक्षेत्राचे पावित्र्य हनन करण्याचे काम केलेले आहे. आता यापुर्वीची भास्कर पाटील, संजय नाईकडे, बुटे यांची समिती पुनश्‍च एकदा शुक्रवारी नगरच्या शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात येऊन संचिका हस्तगत करणार आहे. संचिका उपलब्ध न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवणार का?ते त्याच दिवशी समजेल.

लबाडाच्या कमरेला शिक्षण विभागाची चावी – सध्या अहमदनगर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी तीन अपत्य असूनही खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यामुळे शासनाने 5 महिने 17 दिवस बडातर्फ करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पुन्हा त्यांनी आपले हितसंबंध वापरून त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना सेवेत घेतले असावे. माहिती अधिकारातही त्यांचेवर कारवाई झालेली आहे. अशा मुजोर आणि लबाडाच्या कमरेला सध्या अहमदनगरच्या शिक्षण विभागाची चावी शासनाने दिल्यामुळे कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे

COMMENTS