Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांची टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी

कराड / प्रतिनिधी : जय जय राम कृष्ण हरी… च्या गजरात एसटी कर्मचार्‍यांनी आज एसटीचे शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी भागवत एकादशीची औचित्य साधून कुट

फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात
महावितरणकडून 15 लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश

कराड / प्रतिनिधी : जय जय राम कृष्ण हरी… च्या गजरात एसटी कर्मचार्‍यांनी आज एसटीचे शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी भागवत एकादशीची औचित्य साधून कुटुंबीयासह दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेली दिंडी येथील बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयासमोर नेवून तिथे तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
एसटी कर्मचार्‍यांनी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी आठ दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. त्याअंतर्गत येथील एसटी आगारासमोर सर्व संघटनांचे कर्मचारी एकत्र येवून त्यांनी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर ठिय्या मारला आहे. दरम्यान, आज भागवत एकादशी आणि पंढरपूरची यात्रा आहे. त्याचे औचित्य साधून एसटीच्या कर्मचार्‍यांनी कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयावर दिंडी काढली.
कराड बस स्थानकापासून दिंडी दत्त चौकात नेण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दिंडी तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आली. एसटी आमच्या घामाची, नाही कुणाच्या बापाची… कोण म्हणतो देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत नाय…, एसटीचे राज्य शासनात विलगीकरण झालेच पाहिजे या ना अशा घोषणा देण्यात आल्या. तेथे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एसटीचे शासनात विलगीकरण का आवश्यक आहे, याचे विवेचन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार तांबे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तेथे कर्मचार्‍यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केला.

COMMENTS