Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फास्ट टॅग स्कॅन होण्यास अडचण; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकास मारहाण

सातारा / प्रतिनिधी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी येथील टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून सोमवारी मध्यरात्री नालासोप

राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा
सुरक्षतेच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून महाविद्यालय परिसरात पहाणी
पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 गंभीर जखमी

सातारा / प्रतिनिधी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी येथील टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून सोमवारी मध्यरात्री नालासोपारा येथील वाहनचालकास मारहाण झाली. या प्रकरणी टोल नाका कर्मचार्‍यासह विरमाडे (ता. वाई) येथील दहाजणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. नालासोपारा येथे मयुरेश भाऊसाहेब शेलार (वय 28) हे राहण्यास असून, ते काल रात्री 12 च्या सुमारास स्वत:च्या चारचाकीतून आनेवाडी टोलनाका येथे आले होते. याठिकाणी असणार्‍या लेनमधून कार नेताना शेलार यांनी चारचाकीस असणारा फास्ट टॅग स्कॅन केला. मात्र, तो स्कॅन झाला नाही.
फास्ट टॅग स्कॅन होण्यास तांत्रिक अडचण आल्याने त्याठिकाणी असणारे टोल कर्मचारी व शेलार यांच्यात किरकोळ वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होण्यास सुरुवात झाली. त्याठिकाणी असणार्‍या किरण बाबूराव सोनावणे (रा. विरमाडे), सचिन अशोक जाधव व इतर दहाजणांनी शेलार यांना शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली. याचदरम्यान त्यांनी शेलार यांच्यासह चारचाकीत असणार्‍या निमिष नरेंद्र चव्हाण, प्रथमेश चंद्रकांत घोसाळकर, विठ्ठल भागोजी धुमाळे, दुर्वेश नारायण गिरासे (सर्व रा. नालासोपारा) यांना मारहाण केली. याची तक्रार शेलार यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास हवालदार भोसले करत आहेत.

COMMENTS