Homeताज्या बातम्यादेश

‘अवतार २’ पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आंध्रप्रदेश प्रतिनिधी - अवतार द वे ऑफ वॉटर' अर्थात अवतार २ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याची हवा भारतातही पाहायला मिळाली. अवतार सिनेमाचे चाहत

हरीभाऊ बागडेंचा आमदारींचा राजीनामा
 दोन सराईत चोरट्यांना अटक , कोळशेवाडी पोलिसांची कारवाई
पोलिस उपनिरीक्षकावरच थेट ब्लेडने हल्ला

आंध्रप्रदेश प्रतिनिधी – अवतार द वे ऑफ वॉटर’ अर्थात अवतार २ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याची हवा भारतातही पाहायला मिळाली. अवतार सिनेमाचे चाहते या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत होते. पण हा जेम्स कॅमरॉनचा ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ पाहताना एका चाहत्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आंध्रप्रदेशमध्ये काकीनाड जिल्ह्यात सिनेमा पाहताना एका व्यक्तीचे निधन झाले. पेड्डापुरम शहरातील थिएटरमध्ये ही लक्ष्मीरेड्डी श्रीनू नावाची व्यक्ती अवतार २ सिनेमा पाहण्यासाठी पोहोचली आणि त्यांच्यासोबत ही भयंकर घटना घडली. हृदयविकाराचा झटका आल्याने लक्ष्मीरेड्डी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लक्ष्मीरेड्डी पेड्डापुरम याठिकाणी त्यांचा भाऊ राजूसह ‘अवतार २’ पाहण्यासाठी गेले होते. सिनेमा पाहत असतानाच ते कोसळले. दरम्यान त्यांच्या भावाने लक्ष्मीरेड्डी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लक्ष्मीरेड्डी यांच्या पश्चात त्यांची मुलगी आणि एक मुलगा आहे. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करत होती. अवतार २ पाहण्याच्या उत्सुकतेमध्ये या समस्येची लक्षण अधिक वाढली आणि हे अघटित घडले

COMMENTS