Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात 2024 नंतर हुकूमशाही येईल- उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकले. मात्र, त्यांना ठाकरे नाव मिळणार नाही, ते चोरू शकणार नाही. जर आता आवाज

देशात ओमिक्रॉनच्या 11 सब व्हेरियंटचे आढळले रुग्ण
वडाळामहादेव येथे बिबट्याचे दर्शन; रहिवासी भयभीत
पतसंस्थांच्या पठाणी वसुलीमुळे कर्जदार त्रस्त ; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सहकार विभागाला फटकारले

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकले. मात्र, त्यांना ठाकरे नाव मिळणार नाही, ते चोरू शकणार नाही. जर आता आवाज उठवला नाही तर येणार्‍या काळात देशातील इतर पक्षांसोबत देखील हे होऊ शकते. असेच चालू राहिले तर, देशात 2024 नंतर हुकूमशाही येईल, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दादरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, घटनेनुसार तर 40 आमदार अपात्र ठरले पाहिजे, निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगांच्या आयुक्तांची निवड केली जावी असेही ठाकरेंनी म्हटले आहे. तर मला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्यासह फोनवरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या निधीवर डल्ला मारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असे सांगतानाच 2024 नंतर देशात हुकुमशाही येईल असा दावाही त्यांनी केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, कारण त्यांना वेगळा गट आणि आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. पालिकेतील कार्यालय शिंदेंच्या गटाला देणे हे गुन्हा ठरेल, कारण मनपात सध्या प्रशासक आहे. आमचे हत्यारे हे घरातीलच निघाले, असे म्हणतच त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. तर शिवधनुष्य हे शिंदे गटाला पेलणार नाही, लोकांना हे पटलेले नाही, मी राज्यभर सभा घेणार असल्याचे सांगतानाच एकनाथ शिंदेंनी माझ्या वडिलांचे नाव न वापरता आपल्या वडिलांचे नाव वापरण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे.

निवडणूक आयोग बरखास्त करा – निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, अशी तिखट टीका त्यांनी केली. तर देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू असल्याचे म्हणतच भाजपने दगा दिला असेही त्यांनी म्हटले आहे.पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा संपूर्ण पूर्वनियोजित कट होता, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

COMMENTS