Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालयातील वीज तोडल्याने डायलिसिस सेवा ठप्प

रतन टाटांनी दाखवली माणुसकी मात्र प्रशासनाची बेफिक्री रुग्णांच्या जीवावरइस्लामपूर / प्रतिनिधी : येथील उद्योगमहर्षी रतन टाटा यांच्या सहकार्याने उ

सह्याद्रीच्या रांगेतील चांदोलीच्या दर्‍या-खोर्‍यात नवा पट्टेरी वाघोबा दाखल
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे फार्मा तिर्थाटन !
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत

रतन टाटांनी दाखवली माणुसकी मात्र प्रशासनाची बेफिक्री रुग्णांच्या जीवावर
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील उद्योगमहर्षी रतन टाटा यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय 8 अत्याधुनिक डायलिसिस मशिन्स देण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाततील महावितरणने वीज तोडल्याने तीन महिन्यापासून या मशिन बंद पडले आहेत. त्या लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकिर तांबोळी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरसिंह देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी, कार्याध्यक्ष मकरंद करळे, उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, सुधीर कांबळे, किरण माने, दिलावर शेख यांनी उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे भेट दिली असता केवळ वीज कनेक्शन नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून डायलेसिसची संपूर्ण यंत्रणा धूळखात पडून आहेत. प्रशासकीय बेजबाबदारीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात आल्याचे ठाम आरोप समितीने केले आहेत. 21 नोव्हेंबर 2023 रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे वीज कनेक्शन 1,24,100/- रुपये थकबाकीमुळे महावितरण कंपनीने कायमस्वरूपी बंद केले. शासनाच्या‘अभय योजना अंतर्गत वीज थकबाकी 73,780/- रुपये भरल्यास वीज पुनर्प्राप्ती शक्य होती. परंतु, वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाकडून फक्त 73,760/- रुपये भरले गेले. त्यामुळे ना योजना लागू झाली, ना वीज कनेक्शन मिळाले. महावितरण कंपनीने आता फक्त 50,360/- रुपये भरल्यास कनेक्शन दिले जाईल, असे पत्राद्वारे स्पष्टपणे सूचित केले आहे. मात्र, आरोग्य प्रशासन अजूनही निष्क्रिय आहे.
दिशाभूल करणार्‍या जबाबदार्‍यांवर संघर्ष समितीचा ठपका
वीज थकबाकी रक्कम कोषागार कार्यालयाकडून भरली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, संघर्ष समितीने आक्षेप घेत ही माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक कोषागार कार्यालय फक्त उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाकडून प्राप्त झालेली रक्कमच पुढे पाठवते. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षकांनी देय रकमेची चुकीची रक्कम पाठवून थेट वीज कनेक्शन रोखले गेले. आता त्याची जबाबदारी कोषागार कार्यालयावर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सर्व प्रकारास जबाबदार अधिकारी कोण? वीज कनेक्शन तातडीने जोडले जाऊन डायलिसिस सेवा सुरू का होत नाही? आणि दिशाभूल करणारे अधिक्षक डॉ. देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कधी होणार? अशी मागणी शाकीर तांबोळी यांनी केली आहे.कार्याध्यक्ष मकरंद करळे यांनी ही बाब केवळ इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयापुरती मर्यादित नाही, तर आरोग्य व्यवस्थेतील गंभीर बिघाड आणि जनतेच्या जिवाशी खेळणारी प्रशासकीय बेफिकिरी दाखवणारे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्र संघर्ष समिती हे प्रकरण शासन दरबारी नेऊन तातडीची कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

COMMENTS